माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा शुभेच्छा फलक फाडला, कार्यकर्त्यांत संतापाची लाट
Breaking News | Sangamner Balasaheb Thorat: तालुक्यात गेल्या आठ महिन्यांपासून अशांततेचे आणि तेढ निर्माण करणाऱ्या घटनांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप होत आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा शुभेच्छा फलक फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर.
संगमनेर: शांतता, समृद्धी आणि सुसंस्कृतपणाचे प्रतीक असलेल्या संगमनेर तालुक्यात गेल्या आठ महिन्यांपासून अशांततेचे आणि तेढ निर्माण करणाऱ्या घटनांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप होत आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा शुभेच्छा फलक फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, समाजात अशांतता पसरवणाऱ्या विकृत प्रवृत्तींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
वडगाव पान येथील टोलनाक्याजवळ असलेल्या महादेव मंदिरापाशी श्रावण मासानिमित्त बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या शुभेच्छांचा फ्लेक्स लावण्यात आला होता. मात्र, श्रावणाच्या दुसऱ्याच दिवशी काही समाजकंटकांनी या फ्लेक्सची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिकांनी या विकृत कृत्याचा तीव्र निषेध नोंदवला.
घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने कार्यकर्ते घटनास्थळी आणि यशोधन कार्यालयात जमा झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, इंद्रजीत थोरात यांनी तातडीने कार्यकर्त्यांना शांत केले. या गंभीर घटनेसंदर्भात माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांनी तातडीने संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Breaking News: Former Minister Balasaheb Thorat’s greeting board was torn down