Home अहिल्यानगर अहिल्यानगर: गावठी कट्ट्यासह तरूणाला पकडले; सहा काडतुसेही सापडली

अहिल्यानगर: गावठी कट्ट्यासह तरूणाला पकडले; सहा काडतुसेही सापडली

Breaking News | Ahilyanagar Crime: शहरात अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणार्‍या नेवासा येथील एका तरूणाला कोतवाली पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

Youth caught with village axe six cartridges also found

अहिल्यानगर: शहरात अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणार्‍या नेवासा येथील एका तरूणाला कोतवाली पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. सचिन पांडुरंग घोरतले (वय 38 रा. नेवासा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा व सहा जिवंत काडतुसे असा सुमारे 51 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अंमलदार सलीम शेख यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शनिवारी (26 जुलै) रात्री 9.30 वाजताच्या सुमारास केली. पोलिसांनी एमएसईबी ऑफिसच्या गेटकडून कानडे मळ्याकडे जाणार्‍या रस्त्यावर नगर कॉलेजच्या भिंतीच्या पाठीमागे, दादा पीर दर्याच्या समोर संशयास्पद हालचाली पाहिल्यानंतर संशयित आरोपीला पकडले. झडती घेतली असता त्याच्याकडे 6 एमएम आकाराचे जिवंत काडतुसे आणि मॅगझीनसह गावठी कट्टा आढळून आला.

Breaking News: Youth caught with village axe six cartridges also found

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here