तरुणीला कारमध्ये बसवलं, हात मागे बांधून विवस्त्रं केलं अन् पहाटेपर्यंत अत्याचार
Breaking News | Lonavala Crime: तरुणीवर कारमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक प्रकार समोर.
पिंपरी : लोणावळा शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. लोणावळ्यातील एका स्थानिक तरुणीवर कारमध्ये बलात्कार (Rape) झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणीला लोणावळा परिसरातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिच्यावर गाडी थांबवत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आले. नंतर आरोपीने तिला सामसूम असलेल्या रस्त्याच्या कडेला टाकून दिलं. याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली आहे. इतर दोन नराधमांचा शोध सुरु आहे.
लोणावळ्यातील एका कारमध्ये तरुणीवर चालकासह तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना काल (शनिवारी, ता-27) पहाटे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी दुपारी अडीचला गुन्हा दाखल केला आहे. 23 वर्षीय तरुणीने याबबात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुंगार्ली येथील नारायणीधाम मंदिरापासून तरुणी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पायी जात असतानाच कारमधून जाणाऱ्या तीन अनोळखी व्यक्तींनी तिला अडवलं. तिच तोंड दाबून तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं. त्या तिघांनी तिचे हात पाठीमागे बांधून तिचा मोबाइल काढून घेतला. त्यांनी तिचे कपडे काढून तिला विवस्त्र केलं, त्याचबरोबर तिला मारहाण केली.
रात्री नऊ वाजल्यापासून तीन जणांनी कारमध्ये शनिवारी पहाटेपर्यंत सामूहिक अत्याचार केला. या सर्व प्रकारानंतर त्या तरुणीस नांगरगाव येथील एका रस्त्याच्या कडेला फेकलं. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करत दुपारनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर बारा तासांत या प्रकरणातील एका आरोपीला लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामाघरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या घटनेचा अधिक तपास आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
Breaking News: young woman was put in a car, her hands tied behind her back, stripped naked, and abused