Home अकोले अकोले: सापळा रचून अवैध दारू, कारसह साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

अकोले: सापळा रचून अवैध दारू, कारसह साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Breaking News | Akole: संगमनेर येथील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी अवैध दारू व मुद्देमाल जप्त करून सराईत आरोपीस अटक केली.

Illegal liquor, car and other valuables worth Rs 4.5 lakh seized after setting a trap

अकोले: संगमनेर येथील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी ७वाजेच्या सुमारास अकोले ते देवठाण रस्त्यावरील तांभोळ शिवारात सापळा चारचाकी वाहनासह ४ लाख ४८ हजार ९९० रुपये किमतीच्या अवैध दारूसह मुद्देमाल हस्तगत करून अवैध दारू व्यवसायातील मुख्य आरोपीपैकी एक असलेला सचिन जाधवला अटक केली.

तालुक्यातील शासकीय दारूबंदी समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी समितीचे अशासकीय सदस्य हेरंब कुलकर्णी व आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत पोलिस व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांस अवैध दारूबंदीचे आदेश दिल्यानंतर आपल्या गोपनीय यंत्रणेकडून मिळालेल्या खबरीवरून उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनीही कारवाई केली. या कारवाईत अटक केलेला आरोपी सचिन सुदाम जाधव (वय ३३, रा. पोखरी बाळेश्वर, ता. संगमनेर) हा अवैध दारू वाहतूक गुन्ह्यात यापूर्वदिखील अटकेत होता. सिन्नर तालुक्यातून अकोले तालुक्यात देवठाण मार्गे एका खाजगी वाहनातून बेकायदेशीरपणे देशी व विदेशी दारूची वाहतूक होते आहे, अशी खबर मिळाल्याने शनिवारी पहाटेपासूनच राज्य उत्पादन शुल्क संगमनेर येथील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी तांभोळ शिवारात सापळा रचला. सकाळी ७वाजेच्या सुमारास एक कार तांभोळ शिवारात येत असल्याचे दिसले. पथकाने हे वाहन थांबवण्याचा इशारा केल्यानंतर वाहनाची तपासणी केली. वाहनात चालकाच्या सीटमागे व डिक्कीत देशी दारूचे १८० मिली क्षमतेचे १८ व ९० मिली क्षमतेचे ३ असे २१ बॉक्स, विदेशी दारूच्या १८० मिलीच्या ३७ बाटल्या व १८० मिली क्षमतेच्या ३३ बाटल्या असे एकूण २३ बॉक्स मिळून आले. आरोपी जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Breaking News: Illegal liquor, car and other valuables worth Rs 4.5 lakh seized after setting a trap

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here