अहिल्यानगर: विवाहित महिलेचा विश्वासघात, अत्याचार, गर्भपात अन…
Breaking News | Ahilyanagar Crime: तीन वर्षांहून अधिक काळ एका महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवून तिला फसवणार्यविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. महिलेला गर्भवती करून, तिच्यावर दबाव टाकून गर्भपात घडवून आणण्यात आला असून अखेर लग्न न करता तिचा विश्वासघात.
पाथर्डी: लग्नाचे आमिष दाखवत तीन वर्षांहून अधिक काळ एका महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवून तिला फसवणार्यविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पीडित महिलेला गर्भवती करून, तिच्यावर दबाव टाकून गर्भपात घडवून आणण्यात आला असून अखेर लग्न न करता तिचा विश्वासघात करण्यात आला. या प्रकरणात मुख्य आरोपीसह त्याच्या दोन मेव्हण्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, 2020 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची आरोपी अलीम अब्बास शेख (रा. शेवगाव, जि. अहिल्यानगर) याच्याशी ओळख झाली. काही दिवसांतच मैत्री वाढली आणि आरोपीने प्रेम असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवले. नोव्हेंबर 2021 मध्ये लोणावळ्यातील एका कॉटेजमध्ये आरोपीने पहिल्यांदा पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी लग्न करणार आहे असे सांगून तिला विश्वासात घेण्यात आले.
याप्रसंगानंतर पीडित महिलेच्या संसारात मोठे वादळ निर्माण झाले. आरोपीने तिच्या पतीशी संपर्क करून तिच्या चारित्र्याविषयी अपप्रचार केला. परिणामी, तिचा संसार मोडला आणि 2022 मध्ये तिला घटस्फोट मिळाला. आरोपीने तिला पुन्हा लग्नाचे आश्वासन देत विविध ठिकाणी बोलावून शारीरिक संबंध ठेवले. ऑगस्ट 2022 मध्ये आरोपीने तिला लोणावळा येथे बोलावून आपल्या दोन मेव्हण्यांसह भेट घेतली. तेथेही लग्नाची खोटी आश्वासने देत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला तिसगाव (ता. पाथर्डी) येथे नेऊन अनेकवेळा संबंध ठेवण्यात आले.
नोव्हेंबर 2023 मध्ये पीडित महिला गरोदर राहिली. हे सांगितल्यानंतर आरोपीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. तिने वारंवार लग्नाविषयी विचारणा केली असता, तो वेळ मारून नेत राहिला. अखेर 11 जून 2025 रोजी त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले की, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, माझे आधीच लग्न झाले आहे आणि मला दोन मुली आहेत. यावर पीडित महिलेने त्याच्याशी वाद घातला तेव्हा त्याने तिला बेल्टने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अलीम शेख याच्यासह त्याचे दोन मेव्हणे सिकंदर मजनू शेख (रा. तिसगाव) आणि राजु गुलाब शेख (रा. शेवगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी अलीम अब्बास शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संदीप ढाकणे करीत आहेत.
Breaking News: abused and abortion of a married woman