Home संगमनेर संगमनेर तालुक्यात ७३ ग्रामपंचायतींचा कारभार राहणार महिलांच्या हाती

संगमनेर तालुक्यात ७३ ग्रामपंचायतींचा कारभार राहणार महिलांच्या हाती

Breaking News | Sangamner: तब्बल ७३ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती राहणार असल्याचे स्पष्ट.

administration of 73 gram panchayats in Sangamner taluka will be in the hands of women

संगमनेर:  तालुक्यातील १४४ ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० या कालावधीत सरपंच पदासाठी गुरुवारी (दि. २४) आरक्षण जाहीर झाले. यामध्ये तब्बल ७३ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संगमनेर शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय भवनात प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात ओझर बुद्रुक, खांबे स्त्री, डिग्रस स्त्री, अंभोरे स्त्री, पिंपळगाव कोंझिरा, राजापूर, निमगाव खुर्द स्त्री, गुंजाळवाडी स्त्री, सांगवी स्त्री, धांदरफळ बुद्रुक, देवगाव या गावांचा समावेश आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात शिंदोडी स्त्री, चणेगाव स्त्री, उंबरी, लोहारे स्त्री, खरशिंदे स्त्री, मिर्झापूर, संगमनेर खुर्द स्त्री, औरंगपूर, सावरगाव तळ स्त्री, नान्नज दुमाला, पिंपळे, सोनोशी स्त्री, वरवंडी, तिगाव स्त्री, कोकणगाव स्त्री, सावरगाव घुले, धांदरफळ खुर्द, जाखुरी स्त्री, ढोलेवाडी स्त्री, निमगाव जाळी, खळी, कोल्हेवाडी, मनोली स्त्री, मालुंजे या गावांचा समावेश आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्गात शिरसगाव स्त्री, जवळे बाळेश्वर स्त्री, सावरचोळ, शेंडेवाडी, कुरकुंडी स्त्री, पिंपळगाव माथा, हिवरगाव पठार स्त्री, महालवाडी, जांबुत बुद्रुक, खंदरमाळवाडी स्त्री, कर्जुले पठार, सारोळे पठार, पोखरी बाळेश्वर स्त्री, झरेकाठी स्त्री, बोरबनवाडी स्त्री, प्रतापपूर स्त्री, जोर्वे, पिंपरणे स्त्री, चिकणी, समनापूर स्त्री, आश्वी खुर्द, पारेगाव खुर्द, आश्वी बुद्रुक स्त्री, ओझर खुर्द, निमज स्त्री, कनोली स्त्री, घुलेवाडी, कासारे स्त्री, वेल्हाळे, माळेगाव हवेली स्त्री, वडगाव पान स्त्री, काकडवाडी, देवकौठे स्त्री, करुले स्त्री, जांभुळवाडी, वडझरी बुद्रुक, बिरेवाडी, निमगाव टेंभी स्त्री, शिरापूर या गावांचा समावेश आहे. सर्वसाधारण प्रवर्गात कोळवाडे, भो जदरी स्त्री, अकलापूर, कौठे मलकापूर स्त्री, म्हसवंडी, डोळासणे, कौठे बुद्रुक स्त्री, कोंची, वनकुटे स्त्री, माळे गाव पठार स्त्री, घारगाव स्त्री, बोटा स्त्री, कनकापूर स्त्री, नांदूर खंदरमाळ स्त्री, कुरकुटवाडी स्त्री, आंबीखालसा, खराडी स्त्री, रणखांबवाडी, साकूर स्त्री, नांदुरी दुमाला स्त्री, मांडवे बुद्रुक, साद तपूर स्त्री, हंगेवाडी स्त्री, आंबीदुमाला स्त्री, पिंपळगाव देपा, कासारा दुमाला स्त्री, रहिमपूर, पानोडी स्त्री, रायते स्त्री, पळसखेडे स्त्री, पेमगिरी, चिंचोली गुरव, चिंचपूर बुद्रुक, सोनेवाडी स्त्री, मिरपूर, शेडगाव स्त्री, जवळे कडलग, वडगाव लांडगा स्त्री, दरेवाडी स्त्री, साखखिंडी, चंदनापुरी, कौठे कमळेश्वर, चिखली, कौठे खुर्द, पोखरी हवेली स्त्री, मेंढवण, वडझरी खुर्द स्त्री, कुरण स्त्री, सुकेवाडी, मंगळापूर, निमगाव बुद्रुक स्त्री, रायतेवाडी स्त्री, निमोण स्त्री, कौठे धांदरफळ स्त्री, शिबलापूर, पारेगाव बुद्रुक स्त्री, हिवरगाव पावसा, दाढ खुर्द, वरुडी पठार, वाघापूर, कहे, मालदाड स्त्री, तळेगाव, निमगाव भोजापूर, निंभाळे, निळवंडे, पिंप्री लौकी अजमपूर, खांडगाव स्त्री, खांजापूर स्त्री, झोळे या गावांचा समावेश आहे. सदर आरक्षण सोडत प्रक्रियेस गावोगावचे नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Breaking News: administration of 73 gram panchayats in Sangamner taluka will be in the hands of women

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here