Home संगमनेर संगमनेर तालुक्यात दोन दुकाने फोडली, ४ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज लंपास

संगमनेर तालुक्यात दोन दुकाने फोडली, ४ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज लंपास

Breaking News | Sangamner: अज्ञात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून – अंदाजे ४ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना.

Two shops were broken into in Sangamner taluka

संगमनेर: तालुक्यातील चंदनापुरी गावात मंगळवारी (दि.२२) – पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून – अंदाजे ४ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या भागात पथदिवे बंद असल्याचा चोरट्यांनी पुरेपूर फायदा घेतला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंदनापुरीतील अक्षय सुनील पाचोरे यांचे रॉयल अॅग्रो सर्व्हिसेस नावाचे कृषी केंद्र आहे. मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करत ४० हजार रुपये रोख रकमेसह इतर कृषी साहित्य चोरून नेले. तर काही अंतरावरच असलेले सन मार्ट सुपर शॉपी हे सागर रहाणे यांचे दुकान देखील चोरट्यांनी लक्ष्य केले. मागील बाजूने पत्रा उचकटून आत प्रवेश करत त्यांनी दुकानातील किराणा माल व डीजेचे महागडे मिक्सर अंदाजे किंमत ४ लाख १० हजार रुपयांचे चोरून नेले. या दोन्ही चोऱ्यांमुळे लाखो रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या घटनांची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक देविदास दुमणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर देवकाते, शांताराम झोडगे, बाबासाहेब शिरसाठ यांनी पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरूच होती. या घटनेने नागरिकांमध्ये असुरक्षितता वाढली आहे.

गेल्या अनेक दिवसापासून पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग व त्यालगत असलेल्या सर्व्हिस रोडवरील पथदिवे बंद आहेत. रात्रीच्या वेळेस हा संपूर्ण परिसर काळोखात असतो. स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा यासंबंधी दुर्लक्ष केले आहे. तक्रारी करूनही ठेके दारानेपथदिवे सुरू करण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.

Breaking News: Two shops were broken into in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here