Home पुणे क्लास वन महिला अधिकाऱ्याचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट, अधिकारी पतीनेच घरात स्पाय...

क्लास वन महिला अधिकाऱ्याचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट, अधिकारी पतीनेच घरात स्पाय कॅमेरे लावले

Breaking News |  Pune Crime: क्लास वन अधिकाऱ्याने घरातच स्पाय कॅमेरा बसवला. त्या माध्यमातून पत्नीच्या आंघोळीचा व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल करत असल्याची धक्कादायक घटना.

Video shot of a Class One female officer taking a bath

पुणे : राज्यात अधिकारी-राजकारण्याच्या हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच पुण्यात असाच एक वेगळाच प्रकार घडला आहे. आपल्या अधिकारी असलेल्या पत्नीवर नजर ठेवण्यासाठी क्लास वन अधिकाऱ्याने घरातच स्पाय कॅमेरा बसवला. त्या माध्यमातून पत्नीच्या आंघोळीचा व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल करत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पत्नीने त्या क्लास वन अधिकाऱ्यासोबत सासरच्या सात जणांवर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आंघोळीचे हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तो अधिकारी त्याच्या पत्नीकडून माहेरून गाडी आणि कारच्या हप्त्याकरिता दीड लाख रुपये आणण्यासाठी जबरदस्ती करत होता या प्रकरणी 30 वर्षीय क्लास वन ऑफिसर असलेल्या पत्नीने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सासू, सासरे, दीर आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे.

सन 2020 मध्ये पीडितेचे लग्न झालं होतं. त्यानंतर त्यांचा संसार सुखाचा सुरु होता. मात्र काही वर्षात पतीला पत्नीवर संशय आला. त्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. वारंवार पैशासाठी त्रास देत होता. सोबतच तिच्यावर नजर ठेवण्यासाठी स्पाय कॅमेरेदेखील घरात बसवून घेतले होते.

त्या अधिकाऱ्याला आपल्या पत्नीवर संशय होता. त्यामुळे त्याने घरात स्पाय कॅमेरे लावले होते. ऑफिसमध्ये गेल्यावर तो अधिकारी त्याच्या क्लास वन ऑफिसर असलेल्या पत्नीवर नजर ठेवायचा. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने स्वतःच्या बाथरूममध्येही स्पाय कॅमेरे लावले. त्या माध्यमातून पत्नीचे आंघोळीचे व्हिडीओ त्याने रेकॉर्ड केल्याचं समोर आलं.

आंघोळीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्याने पत्नीला दिली. गाडी आणि घराच्या हफ्त्यासाठी दीड लाख रुपये माहेरून आणण्यासाठीही त्याने जबरदस्ती केली. हा अधिकारी त्याच्या पत्नीला ब्लॅकमेल करत होता.

आपल्याला पतीकडून मानसिक आणि शारिरीक छळ होत असल्याचा आरोप करत त्या पत्नीने पोलिसात धाव घेतली आहे. यामध्ये स्पाय कॅमेराच्या व्हिडीओंचीही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

Breaking News: Video shot of a Class One female officer taking a bath

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here