संगमनेर: दोन मंडलाधिकारी आणि तीन तलाठ्यांना निलंबित
Breaking News | Sangamner Susupended: संगमनेरः तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून येलो आणि ग्रीन झोनमधील जमिनींचे बेकायदेशीर तुकडे पाडल्याप्रकरणी दोन मंडलाधिकारी आणि चार तलाठ्यांना निलंबित करण्यात आले.
संगमनेरः तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून येलो आणि ग्रीन झोनमधील जमिनींचे बेकायदेशीर तुकडे पाडल्याप्रकरणी दोन मंडलाधिकारी आणि चार तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत अकरा जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असली तरी अधिकाऱ्यांना मात्र अभय दिल्याने तो चर्चेचा विषय ठरत आहे.
मंडलाधिकारी बाबाजी जेडगुले (समनापुर) व इराप्पा काळे (साकुर), तलाठी रोहिणी कोकाटे, आलोकचंद्र चिंचुलकर, धनराज राठोड, वैद्य या सहा महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वीही अशीच कारवाई करून पाच जणांचे निलंबन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
निलंबनाची कारवाई: जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या कायद्याचे (अधिनियम 1147) उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महसूल कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रात लहान तुकड्यांमध्ये जमिनीचे विभाजन करण्यास मनाई असताना, ग्रीन झोनमधील जमिनींचे बेकायदेशीर तुकडे पाडले आणि नियमांचे उल्लंघन करून रेखांकन केले, तसेच कोणतीही परवानगी घेतली नाही, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
या कारवाईमुळे महसूल विभागात असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या परवानगीशिवाय असे उद्योग होऊ शकत नाही, असे म्हटले जात आहे. मात्र, तरीही त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना वगळण्यात आल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
Breaking News: Two divisional officers and three Talathas suspended