Home अहिल्यानगर अहिल्यानगर: पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

अहिल्यानगर: पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

Breaking News | Ahilyanagar: पती कायमच दारू पिऊन पत्नीला मारहाण करून मानसिक त्रास देत असे. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने अखेर झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या.

Wife commits suicide due to husband's harassment

राहुरी : पती कायमच दारू पिऊन पत्नीला मारहाण करून मानसिक त्रास देत असे. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने अखेर झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात १४ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली.

कविता संतोष मुंगसे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मृत महिलेचा मुलगा अजय संतोष मुंगसे (वय १८) याने फिर्याद दिली. मुंगसे कुटुंब राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील रहिवासी आहे. महिलेचा पती संतोष रामदास मुंगसे हा सतत दारू पिऊन पत्नी व मुलाला मारहाण करत असत. तसेच

तो कत्ती तसेच घरातील कुन्हाड, कोयता हे हत्यार देखील अनेक वेळा मारहाणीत उगारायचा. दि. १३ जुलै रोजी रात्रीच्या दरम्यान संतोष याने दारू पिऊन काही कारण नसताना पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर दि. १४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास संतोष याने दारू पिऊन पत्नी कविता यांना मारहाण केली. त्यावेळी त्या एकट्याच घरातून बाहेर निघून गेल्या व त्यांनी ब्राम्हणी शिवारातील शेतात जाऊन आंब्याच्या झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, पती संतोष हा गुपचूप कोणाला काही न सांगता पसार झाला होता. त्यानंतर पोलिस पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला गजाआड केले. या घटनेबाबत आरोपी पती संतोष रामदास मुंगसे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात

Breaking News: Wife commits suicide due to husband’s harassment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here