संगमनेर: महिलेचा सर्पदंशाने मृत्यू, वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी गेल्या अन…
Breaking News | Sangamner: अचानक कोब्रा सापावर त्यांचा पाय पडला आणि कोब्राने त्यांच्या उजव्या पायाला दंश.
संगमनेर: तालुक्यातील साकूर शिवारातील पवार वस्ती येथे अंजनाबाई सदाशिव पवार (वय ७०) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना वार – सोमवार दि. १४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे.
अधिक मिळालेली माहिती अशी की, साकूर शिवारात पवार वस्ती येथे अंजनाबाई सदाशिव पवार या ठिकाणी राहत आहे. सोमवारी सायंकाळी घराजवळच वलणीवर वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी अंजनाबाई गेल्या होत्या. अचानक कोब्रा सापावर त्यांचा पाय पडला आणि कोब्राने त्यांच्या उजव्या पायाला दंश केला. त्यानंतर अंजनाबाई यांना साकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
यावेळी सर्पदंशाची (कोब्रा) लस देण्यात आली. त्यानंतर अंजनाबाई यांना पुढील उपचारासाठी लोणी येथे घेऊन जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला. मात्र अंजनाबाई पवार यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलम खताळ यांनी तातडीने आज पवार कुटुंबियाची भेट घेत सांत्वन केले.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी तांबे हॉस्पिटल ते गुंजाळवाडी रोडलगत एक कोब्रा आढळून आला होता. मात्र त्यास जेरबंद करण्यात आले आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आपापल्या घराजवळ फिरताना काळजी घ्यावी.
Breaking News: Woman dies of snakebite