Home अकोले अकोलेत ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा मृत्यू

अकोलेत ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा मृत्यू

Breaking News | Akole Accident: शेतकरी शेतात भात लागवडीसाठी ट्रॅक्टरच्या सहायाने चिखल करत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन मृत्युमुखी झाल्याची घटना.

Accident One killed as tractor overturns in Akole

अकोले : अकोले तालुक्यातील मवेशी येथील शेतकरी शेतात भात लागवडीसाठी ट्रॅक्टरच्या सहायाने चिखल करत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन मृत्युमुखी झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान घडली.

सोमवारी मवेशी येथील विलास बाजीराव बांबळे (वय ३४) हा शेतकरी शेतात भात पूर्व लागवडीसाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने चिखल करत होते. हा ट्रॅक्टर शेतात फसला आणि उलटला. या ट्रॅक्टरच्या खाली चिखलात विलास बांबळे दबले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिस हवालदार सुनील पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेची राजूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Breaking News: Accident One killed as tractor overturns in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here