Home संगमनेर संगमनेरला आणखी पाच बसेस,  तीन महिन्यात दाखल झाल्या १० एसटी बसेस

संगमनेरला आणखी पाच बसेस,  तीन महिन्यात दाखल झाल्या १० एसटी बसेस

Breaking News | Sangamner:  आ.अमोल खताळ यांच्या हस्ते  ५ नवीन एसटी बसेसचे झाले लोकार्पण

Five more buses to Sangamner, 10 ST buses arrived in three months MLA AMOL KHATAL

संगमनेर: राज्यातील महायुती सरकारच्या माध्य मातून आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर आगारात तीन ते साडेतीन महिन्यापूर्वी पाच एसटी बसेस दाखल झाल्या होत्या. आज शनिवारी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पुन्हा ५ एसटी बसेस दाखल झालेल्या आहेत. या पाच ही बसेसचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आला . आता संगमनेर आगारात सहा महिन्यात १० नवीन एसटी बसेस महायुती सरकार च्या माध्यमातून दाखल झाल्या आहेत

  आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर आगारास आणखी ५नवीन एसटी बसेस दाखल  झाल्या आहेत. मागील तीन  ते साडेतीन महिन्यापूर्वी ५ एसटी बसेस दाखल झाल्या होत्या त्यात आता नव्याने  आणखी ५ एसटी बसेसची भर पडली आहे त्यामुळे संगमनेर आजारात आता एकूण दहा नवीन एसटी बसेस आलेल्या आहेत या सर्व गोष्टी तसेच निघून दिल्या त्याबद्दल आगार व्यवस्थापक  प्रशांत गुंड यांनी आ. खताळ यांचे आभार मानले.या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ रहाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, महिला जिल्हा उपप्रमुख दीपाली  वाव्हळ, भाजप शहर अध्यक्ष पायल ताजने, मेघा भगत उषा कपिले आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, कैलास वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, ऍड संग्राम जोंधळे केशव जाधव, रौफ़ शेख भारत गवळी सौरभ देशमुख, सुशील शेवाळे, रोहित चौधरी, शशांक नामन महेश मांडेकर बापू देशमुख रणजित गायकवाड, यां सह महायुतीचे कार्यकर्ते  व संगमनेर आगारातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी केले. सूत्र संचालन शिवसेना उपशहरप्रमुख अजित जाधव यांनी केले तर आभार वाहतूक नियंत्रक गायकवाड यांनी मानले. यावेळी नंदू कानकाटे श्री चौधरी, श्री किसन घुमरे, श्री पटेल, श्रीमती बोंबले . श्रीमती उंबरे मॅडम, इत्यादी कर्मचारी उपस्थित होते..

संगमनेर आगारातील एसटी कर्मचारी चालक वाहक यांच्या ज्या काही समस्या आहे त्या शासनदरबारी मांडून सोडविल्या जातील  बस स्थानक हे आपल्या या असे मानून या प्रस्तानका देणाऱ्या प्रवाशांनी तसेच नागरिकांनी  बसस्थानक आणि एसटी बसेस स्वच्छ ठेवाव्यात.  आमदार अमोल खताळ, सदस्य संगमनेर विधानसभा.

Breaking News: Five more buses to Sangamner, 10 ST buses arrived in three months MLA AMOL KHATAL

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here