Home कोल्हापूर शिक्षणक्षेत्रात खळबळ! मुख्याध्यापकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

शिक्षणक्षेत्रात खळबळ! मुख्याध्यापकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Breaking News | Suicide Case: एका मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना.

Principal commits suicide by jumping into well

कोल्हापूर:  जिल्ह्यातील कागलमध्ये एका मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित विहिरीजवळ जाऊन मृतदेह बाहेर काढला. यावेळी, मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली होती. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मारुती व्हरकट असं या मुख्याध्यापकाचं नाव असून त्यांनी आत्महत्या केल्याने शहरात आणि शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, अग्निशमन विभागाच्या जवानांच्या मदतीने आज सकाळी मृतदेह विहरीतून बाहेर काढण्यात आला.

विशेष म्हणजे कागल नगरपालिकेच्या शाळेत हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे, व्हरकट यांच्या आत्महत्येमागेचं नेमकं कारण काय? असा प्रश्न कुटुबीयांसह नातेवाईकांना देखील पडला आहे. दरम्यान, आत्महत्येचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

Breaking News: Principal commits suicide by jumping into well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here