हातावर मेहंदी, हिरवा चुडा अन् गळ्यात मंगळसूत्र, अवघ्या दीड महिन्याचा संसार आणि आक्रित घडलं
Breaking News | Suicide Case: एका २३ वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या.
छत्रपती संभाजीनगर: कन्नड तालुक्यातील हतनूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका २३ वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केली. गीता शेखर शिंदे असे तिचे नाव आहे. लग्नाच्या दीड महिन्यातच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याने गावात खळबळ माजली आहे. तिने साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गीताचा विवाह १७ मे रोजी रामपूर वाडी येथील शेखर शिंदे यांच्याशी झाला होता. काही दिवसांपूर्वी ती माहेरी हतनूरलाआली होती. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास तिने घरात गळफास घेतला. नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले.
गावकऱ्यांनी सांगितले की, रामू विठ्ठल तुपे यांची गीता मुलगी आहे. पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी तिला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. “गीताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला आहे,” असे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Breaking News: A 23-year-old newlywed committed suicide