Home पुणे विहिरीच्या काठावर ओढणी, संशय आल्याने ४५ फूट खोल अंडरवॉटर कॅमेरा सोडला..तरुणीचा मृतदेह

विहिरीच्या काठावर ओढणी, संशय आल्याने ४५ फूट खोल अंडरवॉटर कॅमेरा सोडला..तरुणीचा मृतदेह

Breaking News | Pune Crime: विहिरीच्या काठावर सापडलेल्या ओढणीच्या आधारे एका तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळून आला.

Dead Body of young woman found on the bank of a well

पिंपरी चिंचवडः दिघीमध्ये विहिरीच्या काठावर सापडलेल्या ओढणीच्या आधारे एका तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. वैष्णवी इंगवले असे या १८ वर्षीय तरुणीचे नाव आहे. या प्रकरणात वैष्णवीची हत्या की आत्महत्या याचा तपास आता दिघी पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ वर्ष वय असलेली वैष्णवी इंगवले अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी दिघी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रारही दिली होती. मात्र ज्या ठिकाणाहून वैष्णवी बेपत्ता झाली होती. तिथून जवळच एक विहीर होती. आणि विहिरीच्या काठावर एक ओढणी सापडली. पोलिसांना संशय आला. त्यांनी या ४५ फूट खोल असलेल्या विहिरीत अंडरवॉटर कॅमेरा सोडला. आणि सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. कारण विहिरीच्या तळाशी वैष्णवीचा मृतदेह होता. हा मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. वैष्णवीची हत्या की आत्महत्या याचा तपास आता दिघी पोलीस करत आहेत.

वडिलांनी वैष्णवी हरवल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणाहून वैष्णवी बेपत्ता झाली. तिथून जवळच असणाऱ्या विहिरीच्या काठावर एक ओढणी सापडली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तातडीने विहिरीत अंडरवॉटर कॅमेरा सोडला. तर तळाशी ४५ खोल फूट विहिरीत वैष्णवी इंगवलेचा मृतदेह (Dead body) आढळून आला. वैष्णवीची हत्या की आत्महत्या याबाबत दिघी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Breaking News: Dead Body of young woman found on the bank of a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here