भाजपच्या नेत्याकडून महिला पोलीस इन्स्पेक्टरचा विनयभंग
Breaking News | Pune Crime: भाजपचे पुण्यातील शहर महामंत्री प्रमोद कोंढरे यांच्यावर एका महिला पोलीस निरीक्षकाने विनयभंग केल्याचा ठपका.
पुणे : पुण्यातील राजकीय वर्तुळातून एक बातमी समोर आली आहे. भाजपचे पुण्यातील शहर महामंत्री प्रमोद कोंढरे यांच्यावर एका महिला पोलीस निरीक्षकाने विनयभंग केल्याचा ठपका ठेवला आहे. परिणामी या प्रकरणी प्रमोद कोंढरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे नेते शनिवार वाड्याजवळ जमले होते. त्यानंतर भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने हे कार्यकर्त्यांना आणि बंदोबबस्तासाठी असलेल्या पोलीसांना एका दुकानात चहा पिण्यासाठी घेऊन गेले. त्यावेळी प्रमोद कोंढरे यांनी गर्दीचा फायदा घेऊन महिला पोलीस निरिक्षकाला दोन वेळा लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केला. त्यानंतर त्या महिला पोलीस अधिकार्याने ही गोष्ट वरिष्ठांना सांगितली. त्यानंतर त्या चहाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज काढून तपासण्यात आले.
प्रमोद कोंढरेंनी पत्रक काढून फेटाळले आरोप, म्हणाले की…
दरम्यान, त्या महिला पोलीस निरीक्षकाने याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिल्यानंतर प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रमोद कोंढरे यांनी एक पत्रक काढून त्यांच्यावरील आरोप फेटाळले असून गैरसमजुतेतून हा प्रकार घडल्याचा दावा केलाय. कोंढरे यांच्यावर याआधी देखील विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.
Breaking News: BJP leader molests female police inspector