Home नाशिक पोलिस शिपायाने सहा वर्षांच्या मुलीला गळफास लावला, स्वतःही आत्महत्या केली

पोलिस शिपायाने सहा वर्षांच्या मुलीला गळफास लावला, स्वतःही आत्महत्या केली

Breaking News | Nashik Crime:  पोलिस शिपायाने स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलीला गळफास लावून संपवलं.

Police constable hangs six-year-old girl, commits suicide himself

नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून पोलिस शिपायाने स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलीला गळफास लावून संपवलं. त्यानंतरल त्याने स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली. घटस्फोटानंतर मानसिक तणावानंतर त्याने हे कृत्य केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. स्वप्नील गायकवाड असं त्या पोलिस शिपायाचं नाव असून भैरवी असं सात वर्षांच्या मुलीचं नाव आहे.

नाशिक शहर पोलिस दलात कार्यरत असलेला पोलीस शिपाई स्वप्निल गायकवाड याचा त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली होता. त्यामुळेच त्याने स्वतःच्या सहा वर्षाच्या मुलीची गळफास देऊन हत्या केली. नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेप्रकरणी नासिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी स्वप्नील गायकवाडच्या घटस्फोटीत पत्नीकडून माहिती घेतली जाणार असल्याचं पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलं. या घटनेमागे नेमकं काय कारण आहे याचाही तपास सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.

Breaking News: Police constable hangs six-year-old girl, commits suicide himself

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here