अहिल्यानगर: महिलेची इंस्टाग्रामवर बदनामी
Breaking News | Ahilyanagar Crime: इंस्टाग्रामवर अनोळखी -व्यक्तीसोबतचे फोटो पोस्ट करून अश्लिल व बदनामीकारक मजकूर टाकत एक महिलेला लज्जा वाटेल असे कृत्य करणाऱ्या कोपरगावच्या युवकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा.
अहिल्यानगर: इंस्टाग्रामवर अनोळखी -व्यक्तीसोबतचे फोटो पोस्ट करून अश्लिल व बदनामीकारक मजकूर टाकत एक महिलेला लज्जा वाटेल असे कृत्य करणाऱ्या कोपरगावच्या युवकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप अशोक पवार (वय १९ रा. वंजार गल्ली, कोपरगाव) असे त्याचे नाव आहे. एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संदीप पवार याने २२ जून रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास इंस्टाग्रामवरील आयडीवरून फिर्यादीचे इतर पुरूषांसोबतचे फोटो पोस्ट करून, त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिला. या प्रकारामुळे फिर्यादीस लज्जा उत्पन्न झाली असून तिची बदनामी होण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट होते. तसेच संशयित आरोपीने वारंवार पाठलाग करून तिचा मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
अहिल्यानगर: शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास सुरू आहे. एका युवतीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची बहीण (वय १६) २० जून रोजी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. संपूर्ण परिसरात तसेच नातेवाइकांकडे शोध घेतल्यानंतरही ती मिळून आली नाही. यापूर्वीही ती दोन वेळा बेपत्ता झाली होती आणि पोलिसांनी सुखरूप शोधून दिले होते. मात्र यावेळी अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिचे अपहरण केल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. दुसऱ्या घटनेत, केडगावातील एका ३२ वर्षीय महिलेने कोतवाली पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे की, १८ जून रोजी दुपारी १२ ते संध्याकाळी ६ च्या दरम्यान त्यांची मुलगी (वय १७) ही केडगाव येथून बेपत्ता झाली आहे. मुलगी कोणास काही न सांगता घरातून निघून गेली असून ती अद्यापपर्यंत परतलेली नाही. तीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
Breaking News: Woman defamed on Instagram crime filed