Home नांदेड झोक्याच्या दोरीने घेतला गळफास

झोक्याच्या दोरीने घेतला गळफास

Breaking News | Nanded Suicide News: बीएसयूपी घरकुलामध्ये राहत असलेल्या एका ४५ वर्षीय युतकाने नातीसाठी बांधलेल्या साडीच्या झोक्याने गळफास घेऊन आत्महत्या.

Suicide hanged himself with a swing rope

नांदेड : शहरातील गोवर्धन घाट परिसरात बीएसयूपी घरकुलामध्ये राहत असलेल्या एका ४५ वर्षीय युतकाने नातीसाठी बांधलेल्या साडीच्या झोक्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. घरी कुणीच नसल्यामुळे शनिवारी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी नोंद केली.

संजय सरपाते असे मयताचे नाव आहे. ते मजुरीचे काम करीत होते. तर त्यांची पत्नी घरकामावर जात होती. बीएसयूपी घरकुलात खालच्या मजल्यावर ते पत्नीसह तर मुलगी आणि नात वरच्या मजल्यावर राहत होते. मुलगी गावाकडे गेल्यामुळे ते वरच्या मजल्यावर शुक्रवारी झोपण्यासाठी गेले होते. या ठिकाणी नातीसाठी बांधलेल्या साडीच्या झोक्याने त्यांनी गळफास घेतला. शनिवारी ही घटना उघडकीस आली.

Breaking News: Suicide hanged himself with a swing rope

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here