Home अहिल्यानगर अहिल्यानगर: गटविकास अधिकारी लाचेच्या जाळ्यात

अहिल्यानगर: गटविकास अधिकारी लाचेच्या जाळ्यात

Breaking News | Ahilyanagar Bribe: दोषारोपपत्राचा अहवाल तक्रादाराच्या बाजूने पाठविण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून गट विकास अधिकाऱ्यांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

Group development officer caught in bribery trap

अहिल्यानगर : तक्रारदार (सेवानिवृत्त) ग्रामसेवकावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली होती. त्यावरील दोषारोपपत्राचा अहवाल तक्रादाराच्या बाजूने पाठविण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून गट विकास अधिकाऱ्यांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे (वय 57, रा. श्रीराम चौक ऐश्वर्या नगरी, अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक असून त्यांच्यावर गटविकास अधिकारी राहुरी यांच्या अहवालावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर तक्रारदार हे सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे वरील दोषारोप पत्राचा अहवाल गट विकास अधिकारी यांनी पाठवायचा होता तो अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठविण्याकरिता गट विकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी दहा हजारांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्यानंतर तत्काळ २० जून २०२५ रोजी पडताळणी सापळा लावला असता गटविकास अधिकारी यांना दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक छाया देवरे यांच्या पथकातील पोलिस नाईक चंद्रकांत काळे, पोलिस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, हरूण शेख यांच्या पथकाने केली.

Breaking News: Group development officer caught in bribery trap

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here