Home संगमनेर संगमनेर: माजी सैनिकाला फसविणाऱ्यास दोन महिने कारावास

संगमनेर: माजी सैनिकाला फसविणाऱ्यास दोन महिने कारावास

Breaking News | Sangamner: दोन महिन्यांचा साधा तुरुंवास व ३७ लाख रुपये देण्याचा आदेश दिला.

Man who cheated ex-soldier gets two months in prison

संगमनेर येथील न्यायालयाचा निकाल संगमनेर: माजी हवाई दल अधिकारी रमेश रंगनाथ सातपुते (रा. संगमनेर) यांची ३५ लाख रुपयांची फसवणूक संगमनेरच्या केल्याप्रकरणी न्यायालयाने मच्छिंद्र सदाशिव नवले यास दोन महिन्यांचा साधा तुरुंवास व ३७ लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे.

यासंदर्भातील हकीगत अशी, की रमेश सातपुते हे हवाई दल ातील निवृत्त अधिकारी असून सध्या ते संगमनेर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे नातेवाईक आर-ोपी मच्छिंद्र सदाशिव नवले याने गाळा व शेती घेण्यासाठी सातपुते यांच्याकडून सुरूवातीस १६ लाख व त्यानंतर १९ लाख असे उसनवार पैसे घेतले होते. सन २०२१ मध्ये घेतलेले हे पैसे २८ फेब्रुवारी २०२२ रोजी परत करण्याचा शब्द मच्छिंद्र नवले याने दिला होता. हा व्यवहार उसनवारीचा व बिनव्याजी असल्याने २३ फेब्रुवारी, २०२२ रोजी नोटरी करारनामा करण्यात येऊन आरोपी नवले याने सा तपुते यांना यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा घुलेवाडीचे पाच धनादेश दिले होते. २८ मार्च, २०२२ रोजी नवले हा ३५ लाख रुपये परत करून धनादेश परत घेणार होते. मात्र आरोपी नवले याने २८ मार्चला सातप ते यांना रोख रक्कम न देता ३५ लाख रुपयांचा धनादेश दिला.

सातपुते यांनी हा धनादेश बँकेत सादर केला असता पेमेंट स्टॉप या शेऱ्यासह तो न वटता परत आला. सदर धनादेश न वटल्याने आरोपी नवले याच्या विरोधात रमेश सातपुते यांनी कलम १३८ नुसार प्रक्रिया जारी केली. त्यावर संगमनेर न्यायालयात सुनावणी होऊन दोन्ही बाजूंनी युक्तीवाद करण्यात आले. फिर्यादी सातपुते यांच्यावतीने वकील ए. डी. घुले, राहुल कडलग, संदीप नलावडे तर आरोपीच्यावतीने वकील पी. जी. वाणी यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपी मच्छिंद्र सदाशिव नवले यास परक्राम्य संलेख अधिनियम १८८१ चे कलम १३८ अन्वये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २५५/२ अन्वये दोन महिन्यांची साध्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. आरोपीने फिर्यादी सातपुते यांना धनादे-शाची रक्कम रुपये ३५ लाख व आरोपीस अधिकची नुकसान भरपाई म्हणून २ लाख असे एकूण ३७ लाख रुपये एक महिन्याच्या आत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम ३५७ अन्वये देण्यात यावी. ही रक्कम न दिल्यास आरोपीस एक महिना साध्या कारावासाची शिक्षा भोगावी, असा आदेश दिला आहे.

Breaking News: Man who cheated ex-soldier gets two months in prison

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here