Home अहिल्यानगर अहिल्यानगर: तरुणाचा मृतदेह आढळला

अहिल्यानगर: तरुणाचा मृतदेह आढळला

Breaking News | Ahilyanagar: युवकाचा मृतदेह बोधेगाव येथे आढळून आला.

body of the young man was found

शेवगाव : तालुक्यातील बोधेगाव येथे शुक्रवारी सकाळी शेवगाव-गेवराई राज्य मार्गावरील मोबाइल कंपनीच्या कार्यालयासमोर कैलास काकासाहेब काकडे (वय ३५) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथे पाठविण्यात आला असून अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

कैलास काकडे (कांबी, ता. शेवगाव) हा गुरुवारी पत्नीसह खासगी बँकेत कर्ज प्रकरणासाठी आला होता. दुपारनंतर मी बाहेर जाऊन येतो असे त्याने पत्नीस सांगितले होते. मात्र तो परत आला नाही. दरम्यान, कंटाळून त्याची पत्नी गावी गेली. रात्री देखील सदर युवक घरी आला नाही. यावेळी त्याच्या शोध घेतला असता तो आढळून आला नाही. शुक्रवारी सकाळी सदर युवकाचा मृतदेह बोधेगाव येथे आढळून आला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुणे येथे हलविण्यात आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे मात्र, हा अपघात आहे की, घातपात हे तपासातून समोर येईल. मयत कैलास याच्यामागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

Breaking News: body of the young man was found

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here