Home अमरावती ठाकरेंच्या शिवसैनिकाची आत्महत्या, चिठ्ठीत ४ जणांचा उल्लेख

ठाकरेंच्या शिवसैनिकाची आत्महत्या, चिठ्ठीत ४ जणांचा उल्लेख

Breaking News | Shiv Sena leader suicide in Amravati : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष यांनी टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत चार जणांचा उल्लेख करण्यात आला.

Shiv Sena leader suicide in Amravati

अमरावती:  जिल्ह्यातील राठीनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल राणे यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. शेतावरील अतिक्रमण आणि मानसिक त्रासाला कंटाळून राणे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. राणे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत चार जणांचा उल्लेख करण्यात आला आह. त्यांच्या शेतावर अतिक्रमण करून मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप शेवटच्या चिठ्ठीमध्ये केला आहे. या चिठ्ठीच्या आधारावर पोलिसांनी संबंधित चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

५६ वर्षीय गोपाल बाबासाहेब राणे यांनी मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. गुरुवारी ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पत्नी घराबाहेर गेल्यानंतर राणे यांनी टोकाचा निर्णय घेतला. गोपाळ राणे यांच्या मृत्यू बातमी समजताच अमरावतीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राणे यांच्या आत्महत्याचेही माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमासाठी पाठवला आहे. राणे यांच्याजवळ सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये चार जणांकडून मानसिक त्रास होत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

गोपाल राणे हे शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून अमरावती आणि राठी नगरमध्ये परिचित होते. त्यांच्या शेतावर काही व्यक्तींनी बेकायदा अतिक्रमण केल्याने त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला, असा दावा त्यांच्या चिठ्ठीत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांच्या जमिनींवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. स्थानिक शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत सरकारकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Breaking News: Shiv Sena leader suicide in Amravati

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here