Home नाशिक कसारा घाटात द बर्निंग कारचा थरार

कसारा घाटात द बर्निंग कारचा थरार

Breaking News | Kasara the Burning Car: जुन्या कसारा घाटात  ‘द बर्निंग कारचा’ थरार झाल्याने सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती.

thrill of The Burning Car at Kasara Ghat

इगतपुरी:  मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात  ‘द बर्निंग कारचा’ थरार झाल्याने सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. आज मंगळवार (दि.१७) रोजी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

जुना कसारा घाटातून ओमनी कार चढून येत असताना टोप बारव जवळ तिने अचानक पेट (Fire) घेतला. कारच्या इंजिनमधून अचानक धूर आणि नंतर आगीचा भडका दिसताच चालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला थांबवत तात्काळ सर्व प्रवाशांना (Passengers) बाहेर उतरवले. या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ओमनी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीम व महामार्ग सुरक्षा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जुना कसारा घाटातील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. तर टोल नाक्याच्या अग्निशमन दलाने त्वरित प्रतिसाद देत आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केल्याने संपूर्ण आग आटोक्यात आली. मात्र, यामुळे जुन्या कसारा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Breaking News: thrill of The Burning Car at Kasara Ghat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here