विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी संगमनेरातील सहा डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीसा
Breaking News | Sangamner: एका विवाहितेच्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी येथील सहा डॉक्टरांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी नुकतीच कारणे दाखवा नोटीस.
संगमनेर : अकोले तालुक्यातील एका विवाहितेच्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी येथील सहा डॉक्टरांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी नुकतीच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पुढील पाच दिवसांत खुलासा न केल्यास पुढील कारवाई करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अकोले तालुक्यातील एका गावातील एका महिलेचा गर्भपातामुळे मृत्यू झाला. तिला त्रास होऊ लागल्याने संगमनेर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर तिची प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली होती. याबाबत तक्रारी गेल्यानंतर चौकशी सुरू झाली होती.
महिलेचा गर्भपातामुळे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सकांनी संगमनेर तालुक्यातील सहा डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजवली आहे. या डॉक्टरमध्ये संगमनेरातील विविध हॉस्पिटलच्या पाच प्रमुख डॉक्टरांसह जोर्वे येथील एका महिला डॉक्टरचा समावेश आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दोन वेगवेगळ्या कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहे. या घटनेबाबत डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालय, संगमनेर आणि पोलीस विभागास तात्काळ कळविणे अपेक्षित असताना तसे त्यांनी केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही माहिती गोपनीय ठेवून संबंधित कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे याबाबतचा खुलासा ५ दिवसांच्या आत संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्फत या कार्यालयास सादर करावा. विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. या नोटीसीनंतर अद्याप एकाही डॉक्टरने खुलासा केलेला नाही.
Breaking News: connection with the death of a married woman