वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते म्हणून… हगवणेच्या वकिलाकडून व्युक्तीवाद
Breaking News | Vaishanavi Hagvane Suicide Case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासू लता हगवणे, ननंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पुणेः वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासू लता हगवणे, ननंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिसांनी पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं असून, पत्नी, सासू, नणंद यांना एक दिवसाची तर सासरा दीराला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैष्णवी चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोपींना न्यायालयात आणण्यात आले. पाचही आरोपींना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलंय. न्यायाधीशांनी त्यांना पोलीस कोठडी दरम्यान पोलीसांकडून काही त्रास झाला का हे विचारले असता पाचही आरोपींनी नाही असे उत्तर दिले.
शिवाजीनगर कोर्टात हगवणे यांच्या वकिलांनी अजब युक्तिवाद केला आहे. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते. ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा असल्याचे त्यांनी युक्तिवादात सांगितले आहे. वैष्णवीची टेंडंसी सुसाईड करण्याची होती. तीचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते. त्यातुन ती आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केलाय. एकदा रेंट पॉइझन खाऊन आणि एकदा गाडीतुन उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला असाही वकिलांनी सांगितलं आहे. तर एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही असं म्हणत अजब युक्तिवाद केल्याचे दिसून येत आहे.
महत्वाचे: नवनवीन अधिक बातम्या मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा.
तर सरकारी वकिलांनी निलेश चव्हाण यांची चौकशी, ५१ तोळे सोने गहाण ठेवल्याची माहिती यावर युक्तिवाद संपवला आहे. या सर्व ऐकून कोर्टाने पत्नी, सासू, नणंद यांना एक दिवसाची तर सासरा दीराला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरनाला वेगळे वेगळे वळण देण्याची चर्चा माध्यमांतून होत आहे.
Breaking News: Suicide Case Vaishnavi starts an unwanted chat with a person