Home राष्ट्रीय धक्कादायक! ज्योती मल्होत्राचं हाफिज सईद कनेक्शन उघड, ‘त्या’ 14 दिवसांत…

धक्कादायक! ज्योती मल्होत्राचं हाफिज सईद कनेक्शन उघड, ‘त्या’ 14 दिवसांत…

Youtuber Jyoti Malhotra : ज्योतीने लष्कर ए तैयबाचं अस्तित्त्व असलेल्या मुरिदके येथे जाऊन चक्क 14 दिवस हेरगिरीचं प्रशिक्षण घेतलं.

Jyoti Malhotra Hafiz Saeed connection revealed

Jyoti Malhotra: यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचं मोठं जाळं उघडं पडलं आहे. आतापर्यंत तपास संस्थांनी अनेकांना बेड्या ठोकल्या आहेत. ज्योती मल्होत्राची मात्र सध्या चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान, याच ज्योतीबाबत अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तिने हेरगिरीसाठी थेट मुरीदकेमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतल्याची माहिती मिळाली आहे.

चक्क 14 दिवस हेरगिरीचं प्रशिक्षण ज्योती मल्होत्राची आज एनआयए तसेच मिलिटरी इन्टेलिजन्स चौकशी करणार आहे. ज्योतीने लष्कर ए तैयबाचं अस्तित्त्व असलेल्या मुरिदके येथे जाऊन चक्क 14 दिवस हेरगिरीचं प्रशिक्षण घेतलं होतं. दहशतवादी हाफीज सईद याच्या लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय मुरिदके इथं आहे. या ठिकाणी ज्योती मल्होत्रा एकूण 14 दिवस होती. या काळात तिने हेरगिरीचं प्रशिक्षण घेतल्याचं म्हटलं जातंय. हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत ज्योतीने याची कबुलीही दिली आहे.

ज्योती मल्होत्राला अटक

पहलगामचा हल्ला झाला, त्याच्या तीन दिवसांआधी ज्योती मल्होत्रा ही काश्मिरात गेली होती. त्यामुळे तिच्यावरचा संशय आणखीच बळावला होता. त्यानंतर हरियाणाच्या पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. त्यामुळे आगामी काळात या हेरगिरीबाबत आणखी मोठीी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

वडिलांची प्रतिक्रिया:

दरम्यान, ज्योतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर तिचे वडील हरिश मल्होत्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्योतीने आम्हाला सांगायची की मी दिल्लीला चालले. पण ती नेमकी कुठे जायची हे आम्हाला माहिती नाही. तिने कधी तिच्या मैत्रिणींना घरी आणलं नाही. दोन दिवसांपूर्वी घरी पोलीस आले होते. पोलिसांनी ज्योतीचा लॅपटॉप तसेच इतर सामान नेले आहे. ज्योतीदेखील घरी आली होती. बॅगमध्ये काही कपडे घेऊन ती गेली. मला काहीही कल्पना नाही, असं ज्योतीच्या वडिलांनी सांगितलं आहे.

Breaking News: Jyoti Malhotra Hafiz Saeed connection revealed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here