Home पुणे अजित पवार गटाच्या नेत्याच्या सुनेची आत्महत्या, कारणही आलं समोर

अजित पवार गटाच्या नेत्याच्या सुनेची आत्महत्या, कारणही आलं समोर

Breaking News | Pune Suicide: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर.

Ajit Pawar Gatachya Netyachya Sunechi Suicide

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) यांनी शुक्रवारी (16 मे) दुपारी मुळशी तालुक्यातील भुकूम येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

वैष्णवी यांच्या वडिलांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वैष्णवीवर पती शशांक, सासू लता, सासरे राजेंद्र, नणंद करिश्मा व दीर सुशील यांनी हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

शुक्रवारी दुपारी वैष्णवी हगवणे यांनी घरातील बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. पतीने दरवाजा वाजवला, प्रतिसाद न मिळाल्याने तो दरवाजा तोडण्यात आला. वैष्णवी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

महत्वाचे: नवनवीन फिचर मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा. 

या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात कलम 498(A), 306, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर हुंड्याचा छळ, मारहाण व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. ही घटना उघड झाल्यानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Breaking News: Ajit Pawar Gatachya Netyachya Sunechi Suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here