Home पुणे बुधवार पेठेतील महिला बेपत्ता, प्रियकरानेच केली हत्या

बुधवार पेठेतील महिला बेपत्ता, प्रियकरानेच केली हत्या

Breaking News | Pune Crime: देहविक्रय करणारी एक महिला दहा ते ते बारा दिवसांपासून बेपत्ता, त्याने महिलेची कोयत्याने खांडोळी करताना तीन तुकडे करून मुळशी तालुक्यातील पिरंगुट आणि मुठा घाटात फेकून दिल्याचे सांगितले.

Wednesday Pethetil woman missing, Priyakarnech Kelly murder

पुणे : बुधवार पेठेत देहविक्रय करणारी एक महिला दहा ते ते बारा दिवसांपासून बेपत्ता होती. पोलिस कर्मचारी राजेंद्र लांडगे यांना त्यांच्या खबऱ्याने अचूक टीप दिली. खबऱ्याने त्याचं काम केलं होतं, आता पुढे पोलिसांना पाहायचे होते. चौकशीत बेपत्ता महिलेचे हनुमंत शिंदे नावाच्या व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचे पुढे आले. पोलिसांनी शिंदे याच्यावर पाळत ठेवली. त्याच्या कृत्याची चाहूल लागताच, त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आढेवेढे घेणारा शिंदे पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखं बोलू लागला. त्याने महिलेची कोयत्याने खांडोळी करताना तीन तुकडे करून मुळशी तालुक्यातील पिरंगुट आणि मुठा घाटात फेकून दिल्याचे सांगितले.

रोजिना ऊर्फ कविता ही बुधवार पेठेत देहविक्रय करत होती. तर हनुमंत शिंदे याचे पेठेतच मोबाईल दुरुस्तीचे दुकान होते. रोजिना हनुमंतच्या दुकानात यायची. त्यातूनच दोघांची ओळख झाली. पुढे दोघांचे सूत जुळले. काही दिवसांनंतर हनुमंत याने रोजिनाला नारायण पेठेत फ्लॅट भाड्याने घेऊन दिला; परंतु हनुमंत हा पूर्वीच विवाहित होता. त्यामुळे तो अधूनमधून रोजिनाकडे जात असे. रोजिनाने हनुमंतला तिच्यासोबत राहण्यासाठी तगादा लावला होता. ती हनुमंतला आता घरी जाऊ देत नव्हती. दुसरीकडे रोजिनाला दारूचे व्यसन होते. दररोज ती देहविक्रीसाठी बुधवार पेठेत जात होती. सकाळी सोडण्याचे आणि संध्याकाळी घेऊन जाण्याचे काम हनुमंतला करावे लागत होते. त्यातूनच दोघांत वाद होत होते.

१२ ऑगस्ट रोजी हनुमंत रोजिनाच्या फ्लॅटवर गेला. त्यावेळी रात्रीचे आठ वाजले होते. सर्वकाही नेहमीप्रमाणे सुरळीत चालले होते. मात्र रोजिनाचा मूड वेगळाच होता. तिने हनुमंतला ‘तू दिवसभर घरी आला नाहीस, कोठे होतास?’ असे म्हणून वाद घालत शिवीगाळ केली. हनुमंत देखील तिच्या रोजच्या जाचाला कंटाळला होता. दोघांतील वाद एवढा विकोपाला गेला की, हनुमंतने रागाच्या भरात रोजिनाचा गळा दाबून खून केला. डोके ठिकाणावर आल्यावर हनुमंतला कळाले की, रोजिना मेली आहे. त्यानंतर फ्लॅट बंद करून त्याने थेट अक्कलकोट गाठले. एक दिवस तो तिकडेच फिरत राहिला. दुसऱ्या दिवशी हनुमंत पुण्यात आला. तीन दिवस रोजिनाचा मृतदेह फ्लॅटमध्येच पडून होता. हनुमंतच्या डोक्यात आता रोजिनाच्या देहाची विल्हेवाट कशी लावायची हा विचार सुरू होता.

१४ ऑगस्ट रोजी रात्री हनुमंतने घरातील सामान शिफ्ट करण्याच्या बहाण्याने छोटा चारचाकी टेम्पो मागून घेतला. त्यानंतर एक कोयता खरेदी केला. त्याचबरोबर वजन पेलतील अशा ताडपत्रीच्या तीन पिशव्या खरेदी केल्या. रात्रीच्यावेळी शांत डोक्याने रोजिनाच्या मृतदेहाची बरोबर तीन खांडोळ्या केल्या. त्या खांडोळ्या तीन पिशव्यात भरून ठेवल्या. कोणाला सुगावा लागू नये म्हणून फ्लॅटमधील रक्ताचे डाग पुसून काढले. दुर्गंधी पसरू नये याचीदेखील खबरदारी घेतली. रोजिना आता हनुमंतच्या तीन पिशव्यात होती. त्याने तिन्ही पिशव्या रिक्षातून भुगाव ते लवासा घाट परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्या. हनुमंतने त्याचे कृत्य लपविण्याची पूर्ण काळजी घेतली होती. त्यामुळे आपण कधीच पकडले जाणार नाही, या अविर्भावात तो मिरवत होता; परंतु पोलिसांच्या नजरेतून तो सुटला नाही.

पोलिसांना बुधवार पेठेतील एक महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या पथकाने हनुमंतला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने रोजिनाचा खून केल्याची कबुली दिली. पोलिस त्याला सोबत घेऊन घाटात गेले. तेथे त्याने कोठे कोठे रोजिनाचे तुकडे फेकून दिले होते, ते सांगितले; परंतु घटनेला बराच कालावधी लोटला होता. त्यामुळे जंगली श्ववापदांनी मृतदेहाच्या तुकड्यांचा बराचसा भाग खाल्ला होता. त्या ठिकाणाहून पोलिसांना रोजिनाचे धड आणि पाय मिळाले.

Breaking News: Wednesday Pethetil woman missing, Priyakarnech Kelly murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here