महिलेवर अत्याचार करणारा अकोलेतील आरोपी जेरबंद
Breaking News | Akole: रात्रपाळीवर काम करीत असलेल्या एका २७ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा.
अकोले: अकोले तालुक्यातील आदिवासी भागातून चाकण परिसरात मजूरीचे काम करत असलेल्या एका तरुणाने चाकण (मेदणकरवाडी) हद्दीत रात्रपाळीवर काम करीत असलेल्या एका २७ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा मंगळवारी (१३ मे) रोजी घडला.
चाकण पोलिसांना या गुन्ह्यातील आरोपी हा अकोले तालुक्यातील मुळ रहिवासी असल्याबद्दल समजले. चाकण पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांतच चाकण पोलिसांकडून या गुन्ह्यातील आरोपी प्रकाश तुकाराम भांगरे याला जेरबंद केले.
मंगळवारी (१३ मे) रात्री ११.१५ ते ११.४५ वाजेच्या सुमारास चाकण जवळील मैदनकरवाडी (ता. खेड, जि. पुणे) गावच्या हद्दीतील मुटकेवाडी येथील भुरुक कॉम्प्लेक्स पाठीमागे ही घटना घडली. एक २७ वर्षीय महिला रात्रपाळीवर कामासाठी एका कंपनीत जात होती. अशावेळेस एका अज्ञात इसमाने तिला धरून जबरदस्तीने शाळेच्या पाठीमागील बाजूस ओढून नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केला. तसेच मारहाण करून या घटनेबद्दल कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेने चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार चाकण पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यांच्या मदतीने विशेष ६ पथके तयार केली. घटना घडलेल्या हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषकाचे सहकार्य घेण्यात आले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाला गती आली. तपासातून आरोपी म्हणून प्रकाश भांगरे याचे नाव निष्पन्न झाले. चाकण पोलिसांनी २४ तासांतच त्यास ताब्यात घेतले. गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यांच्या गुन्हे शाखा युनिट-३ च्या टीमने सखोल तपासात आरपीस विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने घडलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
Breaking News: Adolescent accused of abused ng women is jailed.