Home पुणे नाइट शिफ्टला जाणाऱ्या 27 वर्षीय महिलेवर बलात्कार

नाइट शिफ्टला जाणाऱ्या 27 वर्षीय महिलेवर बलात्कार

Pune Crime News : अडवून, तिला जबरदस्तीने एका निर्जन ठिकाणी नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार.

27 year old woman going to night shift raped

पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चाकण एमआयडीसी परिसरातील मेदनकरवाडीमध्ये मंगळवारी नाइट शिफ्टला जाणाऱ्या 27 वर्षीय महिलेवर अज्ञात व्यक्तीने क्रूरपणे हल्ला करून बलात्कार केला.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित महिला कामावर जात असताना एका अज्ञात व्यक्तीनं तिचा पाठलाग केला. खंडोबा मंदिराजवळ तिला अडवून, तिला जबरदस्तीने एका निर्जन ठिकाणी नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. पीडितेला तातडीने यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे.

महिलेलवर जेव्हा हल्ला झाला, तेव्हा तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडाही केला, मात्र तिच्या मदतीला कुणी धावलं नाही. त्याभागात काहीजण चालण्यासाठी आलेले होते, त्यांनाही हा प्रकार लक्षात आला नाही अशी माहिती आहे. अखेर महिलेनं आरोपीला चावाही घेतला, मात्र तिचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि आरोपीने अतिप्रसंग केला.

या घटनेनं स्थानिक महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, औद्योगिक क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे. गुन्ह्याची माहिती मिळताच उपायुक्त (झोन 3) शिवाजी पवार, गुन्हे शाखेचे पथक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं तपास सुरू केला. तसंच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी आणि रहिवाशांची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, चाकण पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेण्यासाठी सहा विशेष पथकं स्थापन केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. आरोपीचं नाव प्रकाश तुकाराम भांगरे (मेदनकरवाडी, मूळ गाव अहिल्यानगर) असं आहे. पोलिसांनी भांगरे याला ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Breaking News: 27 year old woman going to night shift raped

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here