विवाहसंस्थेच्या संकेतस्थळावरुन ओळख, आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार
Breaking News | Crime news: लग्नाचे आमिष दाखवून ठाणे येथील एका विवाहितेची राहाता तालुक्यातील नांदुर्खी येथील एका इसमाने फसवणूक करत विविध ठिकाणी नेऊन तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
राहाता: तु तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दे!आपण लग्न करु मी तुला सुखात ठेवेन तुझ्या मुलाची चिंता करू नको असे लग्नाचे आमिष दाखवून ठाणे येथील एका विवाहितेची राहाता तालुक्यातील नांदुर्खी येथील एका इसमाने फसवणूक करत शिर्डी नाशिक पुणे अहमदनगर कराड अशा विविध ठिकाणी नेऊन तिच्या सोबत शारीरिक संबंध केले विवाहितेने लग्नाचा तगादा लावताच त्याने पोबारा केला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राहता तालुक्यातील नांदुर्खी येथील मुकूंद भानुदास बिडवे (४२) याने विवाह संस्थेच्या संकेतस्थळावरुन ठाण्यातील एका विवाहितेस लग्नासाठी रिक्वेस्ट पाठवली त्या महिलेस १० वर्षाचा एक मुलगा असुन मुकुंद बिडवे म्हणाला की तु तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दे.पण घटस्फोटाची प्रक्रिया लांबती असल्याने लवकर घटस्फोट होत नाही याचा गैरफायदा घेऊन फसविले पहिल्या पतीपासून घटस्फोट सहजासहजी शक्य नसल्याचे आरोपीने तिला गोड गोड बोलून पूर्णपणे जाळ्यात अडकविले. नेहमी गोड बोलुन नाशिक,पुणे कराड शिर्डी, अहिल्यानगर अशा अनेक ठिकाणी नेऊन तिला शारिरीक संबंध करण्यास भाग पाडले.
तसेच मुकुंद बिडवे याने लॉजमध्ये पिडीतेचे नग्न फोटो काढत व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केले. विवाहितेने लग्नाचा जास्त आग्रह केल्याने मुकुंद बिडवे फरार झाला मात्र विवाहितेने थेट ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांना सविस्तर वृत्त सांगताच त्यांनी आरोपी मुकुंद भानुदास बिडवे (वय) यांचेवर भारतीय न्याय संहिता २०२३ ६९ भारतीय न्याय संहिता २०२३ ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रोहिणी नरशिंगे हे करीत आहे.
Breaking News: Identity from the website of a marriage agency, lured and abused