संगमनेर साखर कारखान्याच्या २० जागा बिनविरोध मात्र एक जागेचा तिढा…
Sangamner Sugar Factory Election: 21 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 20 जागा बिनविरोध झाल्या असून केवळ एका जागेवर निर्णय होणे बाकी.
संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 21) रोजी 68 उमेदवारांनी माघारी घेतले आहे. यामुळे 21 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 20 जागा बिनविरोध झाल्या असून केवळ एका जागेवर निर्णय होणे बाकी आहे. येत्या दोन-तीन दिवसांत कारखाना निवडणूक बिनविरोध होण्याची प्रक्रिया पार पडणार असल्याचा दावा केला जात आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना निवडणुकीसाठी बुधवारी (दि. 9) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 133 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी (दि.15) अर्ध छाननीत 20 उमेदवारी अर्ज बाद झाले होते. चार उमेदवारांनी याच दिवशी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले होते. 21 जागांसाठी ही निवडणूक होणार होती. एकुण 109 उमेदवारी अर्ज होते. यात अनेक उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केले होते. यामुळे अर्जाची संख्या अधिक असली तरी उमेदवारांची मात्र संख्या कमी होती. यात अनेक उमेदवारांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शब्दाला मान देऊन आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. यामुळे कारखाना निवडणूक बिनविरोध झाली आहे.
उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था गट माजीमंत्री बाळासाहेब थोरात बिनविरोध. साकुर गटातून इंद्रजीत खेमनर, सतीशचंद्र वर्षे, रामदास धुळगंड, तळेगाव गटात संपतराव गोडगे, नवनाथ आरगडे, रामनाथ कुटे, धांदरफळ गटात तीन जागा यापैकी पांडुरंग घुले, विनोद हासे हे दोघे बिनविरोध तर एक जागेचा निर्णय होणे बाकी आहे. अकोले-जवळे गट तीन जागा असून, गुलाब सयाजी देशमुख, संतोष रखमा हासे, अरूण सोन्याबापू वाकचौरे बिनविरोध झाले. अनुसूचित जाती जमाती गटाच्या एका जागेवर योगेश भालेराव (मालदाड), महिला गट राखीव दोन जागांसाठी लताताई गायकर, सुंदराबाई डुबे, तर इतर मागासवर्ग गटातून अंकुश ताजणे, भटक्या विमुक्त जाती जमातीतून दिलीप श्रीहरी नांगरे हे बिनविरोध झाले आहेत.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कारखाना निवडणुकीत लक्ष केंद्रित केले होते. आपल्या राजकीय खेळीने संगमनेर तालुक्यातील विरोधकांना चितपट करून विधानसभेतील निवडणुकीचा वचपा काढण्यात त्यांना यश आल्याचे बोलले जाते. कारखाना निवडणूक बिनविरोध होत असल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे मनोधर्य वाढले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीसाठी थोरात यांनी मोठी राजकीय खेळी खेळली असल्याचे बोलले जाते.
Breaking News: Election 20 seats of Sangamner Sugar Factory unopposed but