Home अहिल्यानगर अहिल्यानगर: हॉस्पिटलमधुन पळाला अन् पुढे वाहनाच्या धडकेत मृत्यू

अहिल्यानगर: हॉस्पिटलमधुन पळाला अन् पुढे वाहनाच्या धडकेत मृत्यू

Breaking News | Ahilyanagar Accident: अज्ञात वाहनाने धडक, उपचारापूर्वीच मृत्यू.

Escaped from hospital and later died in a vehicle accident

अहिल्यानगर:  17 एप्रिल रोजी विषारी पदार्थ सेवन केल्यामुळे एका 43 वर्षीय व्यक्तीला येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच, 21 एप्रिल रोजी ती व्यक्ती वॉर्डमधून पळून गेली आणि अहिल्यानगर शहरातील पत्रकार चौक येथे एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली.

या अपघातात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. बाबासाहेब मोहन बर्डे (वय 43, रा. आडगाव, ता. पाथर्डी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी 17 एप्रिल रोजी विषारी पदार्थ सेवन केल्याने त्यांना त्यांची पत्नी छाया बर्डे यांनी उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

उपचार सुरू असताना, 21 एप्रिल रोजी वॉर्डमधून पलायन केले, त्यांना पत्रकार चौक येथे अज्ञात वाहनाने धडक दिली. दरम्यान, त्यांना पुन्हा उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

Breaking News: Escaped from hospital and later died in a vehicle accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here