Home अहिल्यानगर अहिल्यानगर: पत्नी व सासूने मुलाला ठार मारले

अहिल्यानगर: पत्नी व सासूने मुलाला ठार मारले

Breaking News | Ahilyanagar Crime: श्रीरामपूर येथे न राहता अहिल्यानगरला मुलाबाळासह जाण्याचा आग्रह करणाऱ्या जावयाला मारहाण.

Wife and mother-in-law killed son

श्रीरामपूर : श्रीरामपूर येथे न राहता अहिल्यानगरला मुलाबाळासह जाण्याचा आग्रह करणाऱ्या जावयाला मारहाण करून खुनाच्या प्रयत्न करण्यात आला. घटनेप्रकरणी कमल गोटीराम शिंदे (मूळ रा. सोनई, ता. नेवासा, हल्ली रा. बोल्हेगाव एमआयडीसी) यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. मुलगा सुनील शिंदे व सून ताराबाई या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत असल्याने दोन्ही नातवांना घेऊन सून माहेरी श्रीरामपूरला आई-वडिलांकडे गेली होती.

मुलगा सुनील शिंदे हा पत्नी ताराबाई व मुलीबरोबर श्रीरामपूरला राहायला आला. मात्र, त्याचा नगरला राहायला येण्याचा आग्रह होता. त्यावरून त्यांच्यात नेहमीच वाद होत होते. श्रीरामपूर शहरात साई मंदिराजवळ एका  बांधकामाच्या ठिकाणी मुलगा व सून झोपडीत राहून वॉचमन म्हणून काम करीत होते. एक दिवशी सुनीलने विषारी औषध पिल्याची माहिती मिळाली. श्रीरामपूरला तातडीने आलो असता, त्याचा मृतदेह साखर कामगार हॉस्पिटलच्या शवागृहात होता. त्यावेळी सुनीलने गळफास घेतल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी जाऊन पाहिले असता, तेथे फाशी घेतल्याचे काही आढळून आले नाही. त्यामुळे सुनीलचा मृत्यू हा संशयास्पद वाटला.

नातवाला विश्वासात घेत माहिती घेतली असता, सुनील यास त्याची पत्नी व सासू यांनी पाईपने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीनंतर घराच्या बाजूस गेला असता, सून व आई त्याच्यामागे गेले. यावरून मुलाला गळा दाबून ठार मारले, अशी तक्रार आई कमल शिंदे यांनी शहर पोलिस ठाण्यात नोंदविली. आईच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Wife and mother-in-law killed son

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here