Home महाराष्ट्र उच्चभ्रू वस्तीत आंतरराज्य सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पश्चिम बंगालच्या महिलेचा समावेश

उच्चभ्रू वस्तीत आंतरराज्य सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पश्चिम बंगालच्या महिलेचा समावेश

Prostitutions Business: उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या आंतरराज्य सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश. (Sex Racket)

Inter-state sex racket busted in elite neighbourhood

यवतमाळ : यवतमाळ शहरातील उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या आंतरराज्य सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गेडामनगर येथील भरत कॉलनीमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पश्चिम बंगाल येथील महिलेसह चौघांना अटक करण्यात आली असून मुख्य दलाल विजय निरतवार याच्यासह अन्य आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

यवतमाळ शहरात पुन्हा एकदा सेक्स रॅकेटचा प्रकार उघडकीस आला आहे. कोणाला संशय येऊ नये अशा पद्धतीने शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गेडामनगरातील भरत कॉलनीमध्ये हा अवैध धंदा चालविला जात होता. यवतमाळ शहरात यापूर्वी देखील अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान भरत कॉलनी परिसरातील या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकली आहे.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,  भरत कॉलनी येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली. त्यानुसार शहरातील भरत कॉलनी परिसरात सुरू असलेल्या या रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात पश्चिम बंगालच्या महिलेचा देखील यात सहभाग असून त्या महिलेला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान वेश्याव्यवसाय चालविण्यामध्ये दलाल विजय निरतवार याचा या प्रकारात प्रमुख सहभाग असल्याचे समोर आला आहे. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेट सुरू असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Inter-state sex racket busted in elite neighbourhood

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here