Home नाशिक मध्यरात्री घेतला रक्तरंजित बदला, सपासप वार करून तरुणाचा निर्घृण खून

मध्यरात्री घेतला रक्तरंजित बदला, सपासप वार करून तरुणाचा निर्घृण खून

Breaking News | Nashik Crime: एका टोळक्याने तरुणांवर जीवघेणा हल्ला केला. त्यांनी धारदार शस्त्राने तरुणावर वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता, की संबंधित तरुण जागीच मृत्यूमुखी पडला. (Murder)

Bloody revenge was taken in the middle of the night, brutal murder of a young man

नाशिक: नाशिक शहरातील कॉलेजरोड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाची भररस्त्यात हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा हा तरुण घराबाहेर पडला होता, तो संत कबीर नगर परिसरात आला असता, तिथे दबा धरून बसलेल्या एका टोळक्याने तरुणांवर जीवघेणा हल्ला केला. त्यांनी धारदार शस्त्राने तरुणावर वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता, की संबंधित तरुण जागीच मृत्यूमुखी पडला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, अरुण बंडी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो कामगार नगर सातपूर येथील रहिवासी होता. घटनेच्या दिवशी शनिवारी रात्री उशिरा तो घरातून बाहेर पडला होता. तो नाशिकच्या कॉलेज रोडवरील संत कबीर नगर परिसरात आला असता, त्याची हत्या करण्यात आली. टोळक्याने धारदार शस्त्राने वार करत भररस्त्यात रक्तरंजित बदला घेतला आहे. हल्ला केल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले. हत्येची ही घटना उघडकीस आल्यानंतर नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

मयत तरुण आणि हल्लेखोर आरोपी यांच्यात गेल्या काही काळापासून जुना वाद धुमसत होता. याच वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. तसेच हल्लेखोरांच्या दुचाकी रस्त्यावर तोडफोड करून पाडल्या होती. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन रात्री उशिरा पोलिसांनी या परिसरात दंगल नियत्रण पथकाला तैनात केलं होतं. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Bloody revenge was taken in the middle of the night, brutal murder of a young man

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here