कोपरगावमध्ये तीन तास मुसळधार पाउस, १५० घरात पाणी घुसले
कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील गावातील परिसरात सोमवारी जोरदार पाउस झाला. अंदाजे ४० मिलीमीटर पेक्षा जास्त पाउस झाल्याचा अंदाज आहे. पावसाचे पाणी हे ग्रामस्थांच्या घरात शिरले होते.
सोमवारी दुपारी हवामानात झालेल्या बदलातून दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोपरगाव तालुक्यातील भोजडे, गोधेगाव,दहीगाव,धोत्रे, तळेगाव मळे, खोपडी या गावांत तीन तास वादळी वाऱ्यासह जोरदार पाउस झाला. या पावसाच्या पाण्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले होते. धोत्रे गावात तर दीडशे ते दोनशे घरात पावसाचे पाणी शिरले. शेतातील पावसाचे पाणी डांबरी रस्त्यावरून वाहू लागले यामुळे नागरिकांची धावपळ झाली.
या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टरवर पेरणी केलेले सर्व बियाणे वाहून गेले. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शेतीच्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
Website Title: News kopargav taluka heavy rain