Home महाराष्ट्र प्रेमाचे नाटक करीत 24 वर्षीय तरुणीवर अत्याचार

प्रेमाचे नाटक करीत 24 वर्षीय तरुणीवर अत्याचार

Breaking News | Young Woman Abused: 26 वर्षीय प्रियकराने 24 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार (Raped) केल्याची धक्कादायक घटना.

24-year-old girl raped while pretending to be in love

भिवंडी: 26 वर्षीय प्रियकराने 24 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  याप्रकरणी प्रियकराच्या विरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 24 वर्षीय पीडित तरुणी आणि 26 वर्षीय आरोपी तरुण हे दोघेही भिवंडी शहरात राहत असून, दोघांत मैत्री होती, मैत्रीचे रूपांतर प्रेमात करून आरोपी तरुणानं प्रेमाचं नाटक करत पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले, त्यानंतर फिरण्याच्या बहाण्याने पीडित तरुणीवर 24 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीत भिवंडी तालुक्यातील महापोली, वज्रेश्वरी, कल्याण बायपास, अजमेर आदी वेगवेगळ्या ठिकाणच्या लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यान पीडित तरुणीने लग्नाचा तगादा लावला असता त्याने पीडितेला लग्नास नकार दिला. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने 6 मार्च रोजी भिवंडी शहर पोलीस ठाणे गाठून तिच्यावर घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच पोलिसांनी दगाबाज प्रियकराच्या विरोधात भादंवि कलम 64(1) अन्वये गुन्हा दाखल केला असून, चौकशी अंती सदर गुन्हा भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली आहे.

Web Title: 24-year-old girl raped while pretending to be in love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here