Home संगमनेर संगमनेरात पोलिसांची दुचाकीस्वरांवर कारवाई

संगमनेरात पोलिसांची दुचाकीस्वरांवर कारवाई

संगमनेर: करोना विषाणू रोखण्यासाठी सरकारने दोन महिने लॉकडाऊन केले होते. सध्या लॉकडाऊन मध्ये शिथीलता मिळाल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. या गर्दीला पायबंद घालण्यासाठी दुचाकीवरून डबलसीट जाणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी रविवारी कारवाई केली आहे.  

सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, गर्दीत न जाणे, दुचाकीवर एकालाच परवानगी देण्यात आली आहे अशी बंधने घालण्यात आली आहे. मात्र दोन महिने घरात बसणाऱ्या जनतेला सुळसुळाट सुटला आहे. सवलत मिळताच रस्त्यावर गर्दी करू लागले आहे. यातच शहरात व तालुक्यात करोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

संगमनेर शहरात गर्दीला आळा घालण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. तीन ते चार दिवसांपासून पोलीस शहर परिसरात रस्त्याने दुचाकीवर डबलसीट जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आहे. विनाकारण फिरणारे, वेगाने वाहणाऱ्या वाहनावर कायद्याचा धाक दाखविला आहे.

अनेक वाहनचालक कारवाईच्या भीतीने दुसऱ्या मार्गाने जाणे पसंत करतात. तर अनेक नागरिक मास्क वापरत नाही, सामाजिक अंतर पाळत नाही. दुकानात, भाजीपाला घेण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.

पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित व पोलीस निरीक्षक अभय पारमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी कारवाई करत आहे.   

Website Title: Latest News Police take action against two-wheelers in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here