पुजाऱ्याची निर्घुण हत्या करणारा जेरबंद, कारण आले समोर
Breaking News | Ahilyanagar Crime: बोधेगाव येथील पैलवान बाबा मंदिरातील पुजारी नामदेव रामा दहातोंडे (वय ७९ वर्षे, रा. नागलवाडी, ता. शेवगाव जि.अहिल्यानगर) यांची निघृण हत्या करणाऱ्याला जेरबंद.
शेवगाव: अहिल्यानगर तालुक्यातील बोधेगाव येथील पैलवान बाबा मंदिरातील पुजारी नामदेव रामा दहातोंडे (वय ७९ वर्षे, रा. नागलवाडी, ता. शेवगाव जि.अहिल्यानगर) यांची निघृण हत्या करणाऱ्याला जेरबंद करण्यात शेवगाव पोलिसांना मंगळवारी (दि.४) यश आले आहे.
कैलास सुंदर काशिद (रा. एकबुर्जी वस्ती, बोधेगाव, ता. शेवगाव) असे आरोपीचे नाव आहे. पुजारी दहातोंडे यांची निघृण हत्या झाल्याची घटना गुरुवारी (दि.३०) उघडकीस आली होती. एकनाथ भानुदास घोरतळे (रा. बोधेगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुजारी दहातोंडे यांच्या फिर्यादीवरुन गेल्यावर्षी पहिलवान बाबा मुर्ती विटंबनाप्रकणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा रोष मनात ठेवून आरोपी काशिद याने त्यांची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
याचाबत सविस्तर माहिती अशी, बोधेगावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर एकबुर्जी लगत असलेल्या पहिलवान बाबा मंदिरात गेल्या १४ वर्षांपासून सेवा करत असलेले पुजारी नामदेव रामा दहातोंडे हे २६ जानेवारीपासून गायब झाले होते. बाबाबत एकनाथ घोरतळे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांचा शोध सुरू असतानाच गुरुवारी (दि.३०) मंदिराजवळच्या सुशीलाबाई पाटीलबा तांबे यांच्या विहिर परिसरात दुर्गंधी येत असल्याने पाहणी केली असता विहिरीत दहातोंडे यांचे मुंडके आढळून आले, तर शुक्रवारी (३१) जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला,
विभागाचे उपअधीक्षक सुनिल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसे तज्ञ पथक घटनास्थळी दाखल झाले होते. सायंकाळी मंदिरापासून काही अंतरावर अविनाश कदम यांच्या कोरड्या विहिरीत दुर्गंधी येवू लागल्याने पाहणी केली असता दहातोंडे यांचे धड आढळून आले. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, घटनेचा सखोल तपास करून हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात येत होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन पोलीस पथके बोधेगाव, बालमटाकळी, भागात रवाना केली. तपासादरम्यान, संशयित कैलास सुंदर काशिद बाने ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले, अखेर पोलिसांनी याप्रकरणचा छडा लावला असून आरोपीला गजाआड केले आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, अशोक काटे, प्रविण महाले, सहायक फौजदार राजु ससाणे, नाना गर्जे, हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे, पोलीस नाईक ईश्वर गर्ने, पोलीस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ, संतोष बाघ, राहुल खेडकर, प्रशांत आंधळे, एकनाथ गर्कळ, संपत खेडकर, कृष्णा मोरे, राहुल आठरे, प्रियंका शिरसाठ, अमोल ढाळे, राहुल तिकोणे, राहुल गुड्छु, नितीन शिंदे यांच्या पथकाने केली.
Web Title: Prisoner who killed a priest
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News