Home नाशिक ब्रेकिंग! पंचवटीत टोळीयुद्धातून गोळीबार

ब्रेकिंग! पंचवटीत टोळीयुद्धातून गोळीबार

Nashik Firing: दोन गटांतील जुन्या भांडणातून एका गटाने दुसऱ्या गटातील तरुणासमक्ष गावठी क‌ट्ट्यातून हवेत गोळीबार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न.

Panchavati firing from gang war

नाशिक:  पंचवटीतील नागचौकात रविवारी (दि. २) रात्री टोळीयुद्धाचा भडका उडाला. दोन गटांतील जुन्या भांडणातून एका गटाने दुसऱ्या गटातील तरुणासमक्ष गावठी क‌ट्ट्यातून हवेत गोळीबार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एका गटातील दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, गोळीबार करणारे पसार झाले आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारी रात्रीच गणेशवाडी सबपोस्ट ऑफिसमोर दोन टोळ्यांनी पोलिसांसमक्ष दगडफेक केली होती. त्या घटनेला काही तास उलटत नाही तोच गोळीबार झाल्याने पंचवटीतील टोळीयुद्ध भडकल्याचे समोर आले आहे.

याबाबत सराईत संशयितांच्या दोन्ही गटांविरोधात परस्परविरोधी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पंचवटीतील गजबजलेल्या नागचौक (नाग मंदिरामागे) स्थानिक दोन टोळ्यांत अवैध व्यवसायासह जुन्या बादाच्या कुरापतीतून टोळीयुद्ध भडकले, योगेश जगन मोरकर (वय ३१, रा. जोशीवाडा, नागचौक) याच्या फिर्यादीनुसार, तोरविवारी (दि. २) परिसरात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास क्रिकेट खेळत होता. त्याचवेळी त्याच्या ओळखीचा रूपेश उर्फ बाळ्या हा आला व त्याने बाचाबाची करत वाद घालून हातातून बॅट हिसकावून घेतली. तेव्हाच संशयित ऋषिकेश उर्फ सोडम्या गरड व नितीन जाधव, हरदीपसिंग औलक आणि हर्षल संशयित दुचाकीवरून आले.

त्यातील ऋषिकेश उर्फ सोङग्या याने मोरकरला शिवीगाळ करत जमाव जमवत ठार मारण्याच्या उद्देशाने कमरेला लावलेला गावठी कट्टा बाहेर काढून हवेत एक रांऊड फायर केला. त्याचवेळी आता तुला मारून टाकतो असे धमकावले तेव्हा मोरकरने त्याला अडविण्याचा प्रयत्न करून त्याचा हात धरला. तेव्हा त्याने मोरकरला खाली पाडून फरपटत नेले. त्याच्या हाताला हिसका मारत दुचाकीवर बसून सर्वांनी पळ काढला, माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले. त्यानंतर, पंचवटी पोलिसांसह  गुन्हेशाखा पथकांनी पसार संशयितांची धरपकड सुरु केली. संशयितांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

गोळीबाराच्या वरील गुन्ह्यातील संशयित हरदीपसिंग बलवंतसिंग ऑलक (व, २७, रा. रेणू अपार्टमेंट, नागचौक) याने देखील फिर्यादी योगेश मोरकर व त्याचे साथीदार संशयित साहिल उर्फ इटली, सोहम जोशी, राहुल कानडे आणि इतर चौघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, रविवारी (दि. २) रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास हरदीप सिंग घराकडे पायी जात होता. तेव्हा मोरकरसह इतरांनी मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला. तेव्हा साहिल उर्फ इटली याने धारदार शस्त्राने हरदीपसिंगच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. यावेळी संशयित सोहन जोशी, राहुल कानडे आणि योगेश यांनी मारहाण केली. यावेळी स्थानिक नागरिक जमल्याने संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Panchavati firing from gang war

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here