Home करिअर अपहरण करून रिसॉर्टवर नेलं अन्…,  17 वर्षीय मुलीवर अत्याचार

अपहरण करून रिसॉर्टवर नेलं अन्…,  17 वर्षीय मुलीवर अत्याचार

Mumbai Crime: 17 वर्षीय मुलीचं अपहरण आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली 24 वर्षीय महिलेला अटक.

Kidnapped and taken to a resort and..., 17-year-old girl raped

मुंबई: दक्षिण मुंबईत एका 17 वर्षीय मुलीचं अपहरण आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली 24 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने अपहरणाची तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. तपासादरम्यान, पीडित मुलगी आणि आरोपी तरुणीचे फोन बंद असल्याचं आढळून आलं होतं. दोघींचा तीन दिवस शोध घेतल्यानंतर दोघीही विरार येथील एका रिसॉर्टमध्ये आढळून आल्या. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेवर बलात्काराचं कलम जोडलं आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,  17 वर्षीय पीडित मुलगी दक्षिण मुंबईत तिच्या आजीसोबत राहते. तर तिचे आई वडील मुंबईच्या पूर्व उपनगरात राहतात. ७ जानेवारीला ती कॉलेजला जाते म्हणून घरातून निघून गेली होती. यानंतर मुलीने आईला मेसेज करून स्वतःहून घर सोडलं आहे, तिची काळजी करू नये, असा मेसेज केला. या प्रकार समजल्यानंतर कुटुंबीयांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही. काही तासांनंतर तिचा फोन बंद झाला. यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत मुलीचा शोध घ्यायला सुरूवात केली.

पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांनी संशयित महिलेचे कॉल डिटेल्सही मिळवले. संबंधित महिलेनं काही दिवसांपूर्वी विरार येथील एका हॉटेलमध्ये फोन केला होता. त्याआधारे पोलीस विरार मधील संबंधित हॉटेलमध्ये पोहोचले, पण त्या मुली तिथे नव्हता. याबाबत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, दोन मुली हॉटेलमध्ये आल्या होत्या, परंतु त्यांना रुम देण्यात आली नाही, असं हॉटेल कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघींचा माग घेतला.

दरम्यान, पोलिसांना आरोपी महिलेने नवीन सिम कार्ड खरेदी केल्याचा संशय आला. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सिम कार्ड विक्रेत्यांची चौकशी केली आणि आरोपी महिलेचा फोन नंबर शोधून काढला. या नंबरचे लोकेशन ट्रेस करण्यात आले आणि पोलिस विरारमधील एका रिसॉर्टमध्ये पोहोचले. तेव्हा आरोपी तरुणी आणि पीडित मुलगी तिथे आढळून आली. दोघींनी रिसॉर्ट मध्ये राहण्यासाठी आपण बहिणी असल्याचं सांगितलं होतं. तसेच एका परीक्षेसाठी विरारला आल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

“चौकशीदरम्यान, दोघींनी सांगितले की त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. पण पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी आरोपी तरुणीवर पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच तिची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. नंतर तिला भायखळा येथील महिला तुरुंगात पाठवण्यात आलं. दुसरीकडे, पोलिसांनी पीडित मुलीला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याता प्रयत्न केला.पण मुलीने घरी जाण्यास नकार दिला. त्यामुळे तिला बालसुधार गृहात पाठवण्यात आले. आरोपी तरुणीच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.

Web Title: Kidnapped and taken to a resort and…, 17-year-old girl raped

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here