Home अहमदनगर शिर्डीत दुहेरी हत्याकांड! सुजय विखे पाटील म्हणाले…

शिर्डीत दुहेरी हत्याकांड! सुजय विखे पाटील म्हणाले…

Sujay Vikhe Patil ON Shirdi Murder: शिर्डीमध्ये पहाटे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण अहिल्यानगर हादरले.

Double murder in Shirdi Sujay Vikhe Patil said

शिर्डी: शिर्डीत पहाटे तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा खून करण्यात आला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यात दोन जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडले असून तिसऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही प्रकरणे प्लॅन केलेली हत्या नसून नशेच्या आहारी गेलेल्या गुन्हेगारांकडून झालेले ‘रँडम मर्डर’ असल्याचं खासदार सुजय विखे यांनी सांगितलं आहे.

आंतरराष्ट्रीय देवस्थान असणाऱ्या शिर्डीमध्ये सोमवारी पहाटे तिघांवर चाकू हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली .एका तासाच्या अंतरात वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करून दोघांची हत्या करण्यात आली .यात एक तरुण गंभीर जखमी आहे .शिर्डीतील साई संस्थानमध्ये दोघे कर्मचारी पहाटे ड्युटीला येत असताना ही घटना घडली .यातील सुभाष साहेबराव घोडे हे करडोबा नगर चौकाचे रहिवासी आहेत .नितीन कृष्णा शेजुळ यांच्यावर साकुरी शिव तर गंभीर जखमी असलेल्या कृष्णा देहरकर याच्यावर श्रीकृष्ण नगर भागात चाकू हल्ला झाला . अज्ञातांनी पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना केलेल्या चाकू हल्ल्यात दोन कर्मचारी जागीच मृत झाले तर कृष्णा देहरकर गंभीर जखमी आहेत . हत्येचे कारण अजून स्पष्ट नसून पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत .

पहाटे चारच्या सुमारास घडलेल्या या खूनाच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणाव आहे. शिर्डीत हत्या झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या आक्रोशाने परिसर हादरला आहे. दरम्यान,  दुपारपर्यंत आरोपी अटकेत असतील. असं सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय. दरम्यान, उशीरा आलेल्या पोलिसांना जर अपघात आणि मर्डर यातला फरक कळत नसेल तर आता त्यांच्यावर कारवाई करू असंही ते म्हणालेत.

या घटनेबाबत पहाटे साडेपाच वाजता एका पोलिस अधिकाऱ्याला फोन केला असता, त्याने ही घटना अपघात असल्याचे सांगितले. यामुळे संतप्त होत “मर्डर आणि अपघातातील फरक कळत नसेल, तर अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले. सीसीटीव्ही फुटेज तपासून हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेज तपासून हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले.

या घटनेनंतर सुजय विखे यांनी शिर्डीतील मोफत अन्नछत्र बंद करण्याची मागणी केली आहे. “आता अ‍ॅक्शन मोडमध्ये काम करावे लागेल. शिर्डीतील सर्वांनी एकत्र येऊन हा निर्णय घ्यावा. आम्ही हे अन्नछत्र बंद करून घेणारच,” असे ते म्हणाले. शिर्डीमध्ये घडलेल्या या हत्याकांडामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तपास यंत्रणांना वेळ द्यावा, आरोपी दुपारपर्यंत पोलिसांच्या ताब्यात असतील” असे सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Double murder in Shirdi Sujay Vikhe Patil said

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here