पाठलाग, प्रोपोज, तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
Breaking News | Solapur Suicide: तरुणाकडून सातत्याने होत असलेल्या या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.
सोलापूर : एका तरुणाकडून सातत्याने होत असलेल्या या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापुरात ही घटन घडली आहे. वेणूगोपाळ विटकर आरोपींचं नाव असून त्याच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 1 जानेवारी रोजी सोलापुरातील एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून या पीडित मुलीने आपलं जीवन संपवलं आहे. वारंवार तीच्यापाठीमागे जाणे, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारे त्याने अल्पवयीन मुलीला त्रास दिला होता. एकेदिवशी या तरुणाने मुलीला प्रपोज केलं, हा संपूर्ण प्रकार मुलीनं घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी मुलाला समज दिली होती. मात्र त्यानंतर देखील त्याने त्रास देणं, सुरुचं ठेवलं होतं. याच त्रासाला कंटाळून आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचं समजतं.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखळ केली. त्यानंतर वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी वेणूगोपाळ विटकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 108 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम 12 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर पालकांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, नागपुरात सार्वजनिक स्वच्छतागृहात महिलेचा चोरून व्हिडिओ काढणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चित्रकला विद्यालयाचा हा शिक्षक यापूर्वीही अशाच कृत्यासाठी अटक झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत महिलांच्या स्वच्छतागृहात लपून महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्या विकृत मानसिकतेच्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली. मंगेश खापरे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तो नागपूरच्या दिघोरी परिसरात एका खाजगी शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत होता.
Web Title: Solapur news a minor girl suicide after a young man harassment
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News