प्रेयसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वतःवर देखील केले वार
Panvel Crime News : प्रियकराने थेट प्रेयसीच्या घरात घुसून हत्या केल्याची धक्कादायक घटना, स्वतःवर देखील आत्महत्येचा प्रयत्न केला.
पनवेल: प्रियकराने थेट प्रेयसीच्या घरात घुसून हत्या केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली आहे. नविन पनवेलमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणी बरोबर आरोपी निकेश शिंदे याचे प्रेमप्रकरण सुरू होते. यातूनच ही हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात ब्रेकअप झाले होते. मात्र, यानंतर संबंधीत तरुणी इतर मुलाशी बोलत असल्याचा संशय निकेशला आला होता. याबाबत जाब विचारण्यासाठी निकेश शिंदे तरुणीच्या घरी गेला होता. यावेळी दोघांमध्ये वाद झाल्याने रागाच्या भरात निकेशने तरूणीच्या गळ्यावर चाकूने वार केला. यामध्ये गंभीर जखमी झालेली तरूणीचा जागेवरच मृत्यू झाला होता. यानंतर निकेशनेही स्वत:वर चाकूने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपी गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खान्देश्वर पोलीस ठाण्यात निकेश शिंदेवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रेयसीच्या गळ्यावर वार केल्यानंतर निकेशने आपल्या गळ्यावर देखील वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर निकेशला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खान्देश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Web Title: boyfriend broke into his girlfriend’s house and killed her, also stabbed himself
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News