केअर टेकरकने मनोरुग्ण महिलेवर केला अत्याचार, संतापजनक घटना
Breaking News | Pune Crime: सुश्रुषेसाठी ठेवलेल्या कामगाराने मनोरुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. सुश्रुषेसाठी ठेवलेल्या कामगाराने मनोरुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी कामगाराला अटक केली आहे. याबाबत पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, पोलिसांनी ३४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, ३८ वर्षीय पीडित महिला मनोरुग्ण आहे. आरोपीला केअरटेकर म्हणून ठेवले होते. त्याने मनोरुग्ण महिलेला धमकावून त्याने तिच्यावर अत्याचार केला. ३ जानेवारी ते १० जानेवारी दरम्यान त्याने महिलेला धमकावून वेळोवेळी अत्याचार केला. महिला मनोरुग्ण असल्याने सुरुवातीला तिने घटनेची माहिती दिली नाही. अखेर तिने याबाबतची तक्रार दिली. नंतर आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक सावळाराम साळगावकर, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता देवकाते यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम पुढील तपास करत आहेत.
Web Title: Psychiatric woman abused by care taker
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News