Home अकोले संगमनेर: हॉटेल फोडून मद्यासह रोकड लंपास

संगमनेर: हॉटेल फोडून मद्यासह रोकड लंपास

Sangamner Crime: गुंजाळवाडी शिवारात संस्कृती हॉटेल फोडून चोरट्यांनी मद्याच्या बाटल्यांसह रोकड लंपास.

Cash and liquor looted by breaking into a hotel

संगमनेर: शहरात घरफोडीसह चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. गुंजाळवाडी शिवारात संस्कृती हॉटेल फोडून चोरट्यांनी मद्याच्या बाटल्यांसह रोकड लंपास केली आहे. दरम्यान, आता चोरट्यांची नजर हॉटेलसह बियर बार व परमिट रूमकडे वळली आहे, हे विशेष! या चोरीसंदर्भात शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंजाळवाडी शिवारातील संस्कृती हॉटेल नेहमीप्रमाणे रात्री ११ वाजेच्या दरम्यान बंद करून, कामगारांसह मॅनेजर घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलच्या कॅशियरने त्यांना फोन करून सांगितले की, हॉटेलचे शटर उचकटलेले दिसत आहे. कर्मचारी व मॅनेजरने हॉटेलची पाहणी केली असता, हॉटेलचे शटर उचकटलेले दिसले. मागील दरवाजातून आतमध्ये पाहणी केली असता, काउंटरच्यावर लावलेल्या विदेशी मध्याच्या बाटल्या लंपास झालेल्या दिसल्या. गल्ल्यातील रोकड चोरट्यांनी चोरल्याचे आढळले. १३, ३३० रुपयांच्या विदेशी मध्याच्या बाटल्यांसह १ लाख ४० हजार रुपयांची रोकड असे एकूण १ लाख ५३, ३३० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी हॉटेलचे मॅनेजर सुबोध शेट्टी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

Web Title: Cash and liquor looted by breaking into a hotel

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here