पालकमंत्र्यांची यादी जाहीर, अहिल्यानगरचे विखे पाटील तर धनंजय मुंडे यांना…..
Ajit Pawar: अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार.
आताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. तर धनंजय मुंडेंना यादीतून वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांचं पालकमंत्रिपदाच्या यादीतून नाव वगळ्यात आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्रि असणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याचे राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री असणार आहेत.
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम – हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील
> सातारा -शंभुराजे देसाई
> छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
> जळगाव – गुलाबराव पाटील
> यवतमाळ – संजय राठोड
> कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
> अकोला – आकाश फुंडकर
> भंडारा – संजय सावकारे
बुलढाणा – मंकरंद जाधव
> चंद्रपूर – अशोक ऊईके
> धाराशीव – प्रताप सरनाईक
> धुळे – जयकुमार रावल
> गोंदिया – बाबासाहेब पाटील
> हिंगोली – नरहरी झिरवळ
> लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
> मुंबई शहर – एकनाथ शिंदे
> मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा/
> नांदेड – अतुल सावे
> नंदुरबार – मानिकराव कोकाटे
> नाशिक – गिरीश महाजन
> पालघर – गणेश नाईक
> परभणी – मेघना बोर्डीकर
> रायगड – अदिती तटकरे
> सिंधुदुर्ग- नितेश राणे
> रत्नागिरी – उदय सामंत
> सोलापूर – जयकुमार गोरे
> वर्धा – पंकज भोयर
> जालना – पंकजा मुंडे
Web Title: List of guardian ministers announced, Vikhe Patil from Ahilyanagar and Dhananjay Munde
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News